
मोर्शी नगर परिषदेच्या छतावरील पार्टी चर्चेत, अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्याची चर्चा; व्हायरल व्हिडीओने खळबळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नगर परिषदेच्या इमारतीच्या छतावर रात्रीच्या वेळी पार्टी सुरू असल्याचे दिसत आहे. या आयोजनात नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. शासकीय कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सरकारी इमारतीच्या छतावर अशा प्रकारे पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने प्रशासकीय शिस्त आणि शासकीय मालमत्तेच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ड्रोनचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल
नगर परिषदेची इमारत ही सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी तेथे पार्टीचे आयोजन झाल्याचा प्रकार आणि त्याचे ड्रोन चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या संपूर्ण प्रकरणाला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकाराबाबत नगर परिषद प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हे सुद्धा वाचा : मेहुण्यानेच जावयाचा काढला काटा, भर चौकात रक्तरंजित थरार; नागपुरातील घटनेनं खळबळ
शासकीय यंत्रणेकडून संवेदनशीलतेची अपेक्षा
एकीकडे शहरातील नागरिक पाणी, स्वच्छता आणि अन्य मुलभूत सुविधांसाठी नगर परिषद प्रशासनाकडे अपेक्षेने पाहत आहेत. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयाच्या छतावरील पार्टीचा व्हिडीओ समोर आल्याने प्रशासनाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा सुरू झाली आहे. दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती असताना शासकीय यंत्रणेकडून संवेदनशीलता आणि जबाबदारीची अपेक्षा केली जाते. अशा परिस्थितीत शासकीय इमारतीवर जल्लोष सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे.
Ans: मोर्शी नगर परिषदेच्या शासकीय इमारतीच्या छतावर रात्रीच्या वेळी कथितरीत्या ओली पार्टी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Ans: ड्रोन कॅमेऱ्याने चित्रित केलेला पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
Ans: शासकीय इमारतीचा खासगी कार्यक्रमासाठी वापर, प्रशासकीय शिस्त आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.