नागपूर : एका कारखान्यात काम करणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्या सहकाऱ्याने सुमारे सहा महिने शारीरिक अत्याचार केले. या काळात तो तिला ॲसिड हल्ला करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता. सातत्याने होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने वाडी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली.
सचिन सवाईतूल असे या आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन पीडिता आणि आरोपी सचिन सवाईतूल हे एकाच कारखान्यात काम करत होते. सचिनने प्रथम तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर ॲसिड हल्ला करण्याची तसेच तिच्या आईचेही बरेवाईट करण्याची धमकी दिली आणि जुन्या मित्रासोबतचे फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपी सचिनने अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंधास भाग पाडले आणि जवळजवळ सहा महिने तिचे लैंगिक शोषण केले.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्…
दरम्यान, पीडिता घाबरली आणि धक्क्यात होती. पण शेवटी तिने धाडस केले आणि चाईल्डलाईनची मदत घेतली. चाईल्डलाईन टीमने पीडितेला तात्काळ मदत केली आणि तिला वाडी पोलिस ठाण्यात नेले. पीडितेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये वाढ
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना टोप (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकारानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता 16 वर्षीय विद्यार्थिनीवर तब्बल सहा महिने अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार नागपुरात घडला. याप्रकरणी 46 वर्षीय व्यक्ती गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हेदेखील वाचा : Nashik Crime: लोकशाहीच्या स्तंभावरच जीवघेणा हल्ला; मारहाणीत पत्रकार जखमी अन् भुजबळ अॅक्शन मोडमध्ये