धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात गेली अन्... (फोटो सौजन्य: social media )
हातकणंगले : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता टोप (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकारानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रणित धोंडीराम कांबळे (वय २०, रा. राजीव गांधीनगर टोप) या युवकाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फिर्यादी सतरा वर्षीय युवती व आरोपी प्रणित कांबळे टोप येथे राहतात. फिर्यादी मुलीने दिलेल्या माहितीनुसार, युवकाने गेल्या काही महिन्यांपासून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यात ती गर्भवती झाली. तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेदेखील वाचा : Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल
दरम्यान, या पीडित मुलीने सरकारी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. त्यामुळे प्रणित कांबळे यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शिरोली पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
पुण्यातही अत्याचाराची घटना
पुण्याच्या पिंपरी- चिंचवड येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे. ही घटना वाकड परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये घडली आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण
नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता शहरात वेगवेगळे गुन्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघड झाल्या आहेत. या घटना जरीपटका आणि यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असून, पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.