पत्रकारांवर जीवघेणा हल्ला (फोटो- istockphoto)
नाशिकमध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला
कारवाई करण्याचे भुजबळ यांचे पोलिसांना आदेश
जखमी पत्रकारांवर उपचार सुरू
Attack On Nashik Journalist/Crime News: नाशिक जिल्ह्यात पत्रकारांवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात अनेक पत्रकार जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पत्रकारांवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत. त्र्यंब्यकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या ठिकाणी नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
त्र्यंब्यकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. तेथील गुंडांच्या टोळक्याने पत्रकारांवर हल्ला केला आहे. यात अनेक पत्रकार जखमी झाले आहेत. इथे काही गुंड अवैध पद्धतीने प्रवेश पावती देत पैसे उकळत होते. त्याचवेळेस हा प्रकार घडला आहे. या हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
या गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारांवर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान या हल्ल्याचा पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे.
दरम्यान या घटनेची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जखमी झालेल्या पत्रकारांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही थांबण्याचं नावाचं घेत नाही आहे. मारहाण, हाणामारी, हत्या, विनयभंग, अत्याचार यासारख्या अनेक घटना समोर आले आहे. यामुळे बीड जिल्ह्याचा सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केज तालुक्यातून विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. केज पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण बेडसकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीला गाडीत बसवून नेत तिचा विनयभंग केला आहे. ही घटना काल शुक्रवारी घडली. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
Beed Crime: बीड येथील गुन्हेगारी काही थांबेना! गटशिक्षणाधिकाऱ्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नेमकं काय घडलं?
मिळेलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बेडसकर याने एका महिलेसह एका सोळा वर्षाच्या मुलीला गाडीमध्ये बसवून नेत एका शेतामध्ये या मुलीचा विनयभंग केला. त्या ठिकाणी काही इतर लोक येताच बेडसकर याने तिथून पळ काढला. यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या केज पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत.