crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची गोळी घेतल्यानंतर मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीवर बलात्कार करणाऱ्या शिकवणी शिक्षकाला अटक केली असून तिला गर्भपाताची गोळी देणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी सुरु केली आहे.
Andekar Gang : आंदेकर टोळीची दहशत? तपासातून धक्कादायक माहिती उघड; गेल्या 12 वर्षात तब्बल…
उपचारादरम्यान मृत्यू
पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती आणि ती साडेचार महिन्यांची गर्भवती होती. तिच्या वडिलांनी बदनामीच्या भीतीने नांदेड येथील एका डॉक्टरशी संपर्क साधला. त्याने तिला गर्भपातासाठी काही गोळ्या दिल्या. मात्र, या गोळ्या घेतल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला गंभीर रक्तस्राव सुरू झाला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कोण केला बलात्कार?
मृतक ही २८ वर्षीय शिक्षक संतोष गुंडेकर यांच्याकडे शिकवणीसाठी जात होती. २०२४ पासून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मृत्यूपूर्वी मुलीने दिलेला जबाब नोंदवून घेतला आहे. हा जबाब या प्रकरणातील महत्वाचा पुरावा मानला जात आहे. पोलिसांनी शिकवणी शिक्षकाला अटक केली आहे.
औषध देणाऱ्या डॉक्टरची चौकशी
या प्रकरणात ज्या डॉक्टरने औषध दिले त्या नांदेडच्या डॉक्टरची चौकशी देखील करत आहे. पोलिसांनी सांगितले की, त्या डॉक्टरकडे गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर परवानग्या नव्हत्या. तरीही त्याने मुलीवर उपचार केले. सध्या डॉक्टरचीही सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे पुसद शहरात संतापाचे वातावरण असून, आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मुलाचा जन्मदात्या आईनेच केला खून
शोभा दमडू चव्हाण (वय ५०) आणि नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (वय ४५, दोघेही रा. मोझर) अशी आरोपींची नावे आहेत. शोभा आणि नरेंद्र या दोघांचे अनैतिक संबंध होते. यामध्ये शोभाचा मुलगा कमल चव्हाण (वय ३०) हा अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी ऑगस्ट २०२० मध्ये त्याचा धारदार शस्त्राने मारून शोभाच्या घरातच खून केला. नंतर त्याचा मृतदेह स्मशानभूमीत फेकून दिला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी शोभाने अनोळखी चौघांविरोधात मुलाचा खून केल्याची तक्रार दिली. मात्र, तत्कालीन ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी केलेल्या तपासात शोभा आणि तिचा प्रियकर नरेंद्र हे दोघे आरोपी असल्याचे पुढे आले. या दोघांना मृतदेह फेकताना एकाने पाहिले होते. त्यावरून आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर नेर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेआणि न्यायालयाने या मृतकाच्या आईसह प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
भाजपचा माजी नगरसेवकच सूत्रधार ! नाशिकच्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती