Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी

चंद्रपूरच्या भद्रावतीतील संताजीनगर परिसरात वादग्रस्त खुल्या प्लॉटवरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले असून परस्परांच्या तक्रारीवरून एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 03:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वादग्रस्त प्लॉटवर भूमिपूजनाच्या प्रयत्नातून दोन गटांत संघर्ष.
  • दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल.
  • पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून तपास सुरू केला.
चंद्रपूर: भद्रावती शहरातील संताजीनगर परिसरात सोसायटीच्या शिल्लक खुल्या प्लॉटवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी विकोपाला जाऊन २ गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले असून परस्परांच्या तक्रारीवरून एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संताजीनगर येथील प्लॉट क्रमांक ८०, ८१, ८२, ८३, ८७, ८८ व ८९ हे प्लॉट वादग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सोसायटीने या संदर्भात लहानू बावणे व इतर सात जणांना वकिलामार्फत नोटीस बजावून कोणतेही काम न करण्याची सूचना दिली होती. मात्र शुक्रवारी सकाळी संबंधित सात जण काही इतर लोकांना सोबत घेऊन लोखंडी रॉड,धारदार शस्त्रे व लाठ्या-काठ्या घेऊन प्लॉटवर आल्याचे सांगितले जाते. त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी युगेश खोबरागडे व इतर सोसायटी सदस्यांनी संबंधितांकडे सातबारा उतारा दाखविण्याची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला.

Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दुसऱ्या गटातील व्यक्तींनी अश्लील शिवीगाळ करत लाठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीसह सात ते आठ जण जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीवरून महेश लोणकर, जयश्री लोणकर, सुनिल बावणे, अर्चना बावणे, निखिल बावणे, शुभम नागोसे व ताईबाई लोणकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पूजा सुरू असतानाच झाली तुफान हाणामारी

दरम्यान, दुसऱ्या गटातील जयश्री महेश लोणकर यांनी दिलेल्या तक्रारीत संबंधित प्लॉटवर त्यांचा मालकी हक्क असून सातबाऱ्यावर त्यांची नोंद असल्याचा दावा केला आहे. प्लॉट साफसफाई करून पूजा सुरू असताना युगेश खोबरागडे यांनी तेथे येऊन ‘ही माझी गाडी ठेवण्याची जागा आहे, तुम्ही येथे काय करता?’ असे म्हणत वाद घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, अश्लील शिवीगाळ करून हाताबुक्यांनी व लाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यांच्या विरोधात गुन्हे दाखल

तक्रारीवरून मनोज आस्टूनकर, युगेश खोबरागडे, हरी खोबरागडे, खुशाल मस्के, प्रियाषु मस्के, चिन्नू खोबरागडे, सुनील डांगे व इम्रान शेख (सर्व रा. संताजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संताजीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील संताजीनगर परिसरात.

  • Que: वादाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: सोसायटीच्या वादग्रस्त खुल्या प्लॉटवरील मालकी हक्क आणि भूमिपूजनाच्या प्रयत्नावरून वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: परस्पर तक्रारींवरून १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Dispute over plot cases registered against 16 people from both groups clash between two groups in santajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur News: ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती वादात! स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, चौकशीची मागणी
1

Chandrapur News: ई-पीक पाहणीसाठी सहायकांची नियुक्ती वादात! स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, चौकशीची मागणी

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
2

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा
3

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये पावसाचा लपंडाव; ५०२ मिमी पावसाची नोंद, खरीप पिकांना दमदार सरींची प्रतीक्षा

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
4

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.