Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Darashiv News: महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड; ५.८५ लाखांच्या ठेव रकमेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बेंबळी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बेंबळीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 17, 2026 | 05:57 PM
महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड (फोटो सौजन्य-Gemini)

महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

धाराशिव : जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेव रक्कम स्वीकारल्यानंतर मुदत संपूनही रक्कम व व्याज परत न केल्याच्या आरोपावरून तालुक्यातील बेंबळी येथील श्री चतु:श्रृंगी महिला सरकारी पतसंस्था मर्या., बेंबळी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बेंबळीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारीत काय नमूद?

फिर्यादी प्रेमराज शिंदे यांनी सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार, त्यांनी व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावे संबंधित पतसंस्थेत सप्टेंबर २०२० ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत खाते उघडून ठेव रकमेचे व्यवहार केले होते. संस्थेकडून जादा व्याजदराची हमी व खात्री देण्यात आली होती. मात्र सप्टेंबर २०२० पासून व्याज देणे थांबवण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनही ठेव रक्कम परत देण्यात आली नाही. फिर्यादी यांच्या पत्नीच्या नावे ठेवलेली ५ लाख ८५ हजार रुपयांची मुदत ठेव परत न करता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासघात व फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

आरोपी कोण?

या प्रकरणी मनिषा प्रमोद पवार (चेअरमन), अर्चना श्रीहरी शिवलकर (व्हाईस चेअरमन), जयश्री धनंजय मुंगळे (सचिव), प्रतिभा बालाजी गावडे (संचालक), श्रीदेवी युवराज दाणे, जयदीबी इराफान शाह, सुवर्णा रवि कांबळे, अनिता अनिल कांबळे, सुषमा महादेव माळी (लोखंडे), मिना गौतम जावळे, सुरेखा बालाजी ढोरमारे व धनंजय जनार्धन मुंगळे (सर्व रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संचालक असलेल्या प्रतिभा बालाजी गावडे या धाराशिव पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी गावडे यांच्या पत्नी असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

कोणत्या कलमान्वये गुन्हा?

बेंबळी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ४०९ (विश्वासघात), ४०६, ४१५, १४७ (बेकायदेशीर जमाव) व ३४ (सामूहिक हेतू) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ठेवीदारांमध्ये चिंता

या घटनेमुळे परिसरातील इतर ठेवीदारांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. संबंधित पतसंस्थेत आणखी किती ठेवीदारांची रक्कम अडकली आहे, याबाबतही चर्चा सुरू आहे. पोलिस तपासातून नेमका आर्थिक व्यवहार किती झाला आणि किती जणांची फसवणूक झाली, याचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असून आर्थिक गैरव्यवहाराचा सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी

Web Title: Major financial scam of women cooperative revealed in bembli darashiv taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
1

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
2

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
3

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
4

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.