धक्कादायक ! 21 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; 14 महिन्यांपू्र्वीच झाला होता विवाह
टाकळघाट : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या यांसारखे प्रकार समोर येत आहेत. असे असताना घरातील लोखंडी व्हेंटिलेटरला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन विवाहित महिलेने आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टाकळघाट येथे सोमवारी (दि.16) दुपारच्या सुमारास घडली.
चैताली मनोज कामडी (वय 21, रा. टाकळघाट) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचा संसार हा फक्त 14 महिन्यांचा झाला होता. याबाबत माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून त्यांनी मृतदेह नागपूर येथे शासकीय रुग्णालय पाठविला. टाकळघाट येथील घटना घडल्याचे समोर आले आहे.
केवळ चौदा महिन्याचा संसार
मनोज आणि चैतालीचा विवाह 16 एप्रिल 2024 ला झाला होता. दोघांचा ही संसार आनंदात सुरु होता. असे कोणते कारण घडले की, महिलेने आत्महत्या केली. याचा तपास उपविभागीय पोलिस निरीक्षक दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल मोरे करत आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून महिलेचा पती मनोज आणि सासू रत्नमाला यांच्यावर विविध कलमांतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐरोलीत तरुणीची आत्महत्या
ऐरोली सेक्टर 1 मध्ये एका तरुणीने सकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली होती. नंदिनी तिवारी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीच नाव असून, ती मूळ कानपूरला राहायला होती. नंदिनी काही कामानिमित्त ऐरोलीत गेल्या तीन महिन्यापूर्वी पिजीमध्ये राहायला होती. तिच्यासोबत राहणाऱ्या मैत्रिणी सुट्टीत गावी गेल्यावर तिने गळफास घेत आत्महत्या केली.