दारूविक्रीच्या वादातून तरुणाची निघृण हत्या
पथ्रोट : गावातील अवैध दारू विक्रीच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 31) घडली. सनी दशरथ भीमसागर (वय 23) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. अभिजित मात्रे असे आरोपीचे नाव आहे.
हेदेखील वाचा : बोपदेव घाट प्रकरणानंतर निर्जनस्थळांच्या सुरक्षेवचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांची PMC ला माहिती, उपाययोजना करणार
अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. गावातील पोही रस्त्यावरील अतिक्रमित जागेवर झोपड्या बांधून गावातील काही तरुणांनी अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. त्यामुळे याबाबत या परिसरातील डब्ल्यू.के. एल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे प्रशासन आणि पालकांनी काही दिवसांपूर्वी पथ्रोट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, याच वादातून अभिजित मात्रे नामक तरुणासह त्याच्या चार मित्रांचा सनीच्या वडिलांशी वाद झाला. त्यानंतर घरासमोर उभ्या असलेल्या अभिजित मात्रे यांनी सनीवर तलवारीने हल्ला केला. त्यामुळे सनी रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले.
या घटनेच्या माहितीवरून कुटुंबीय रक्तबंबाळ अवस्थेत त्याला पथ्रोट येथील शासकीय रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात नेला. त्यानंतर मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं
नागपुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरातील भवानीनगरमध्ये सोमवारी (दि.30) रात्री घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण परसरले आहे. या हत्येच्या घटनेत दोन सख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. तहसील पोलिस ठाण्यांतर्गत दोन भावांवर दूरच्या नातेवाईकाने चाकूने वार करून हत्या केली. व्यावसायिक पैशाच्या व्यवहाराच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या हत्येतील चार आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. खुनाची ही घटना गांधीबाग बागेजवळ रस्त्याच्या मधोमध रविवारी रात्री 10.45 च्या सुमारास घडली.
लखनऊमध्येही नव्या वर्षीच कुटुंबातील सदस्यांची हत्या
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये नव्या वर्षीच आग्रा येथील एका कुटुंबातील सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाने वृद्ध आई आणि चार बहिणींवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या हत्येबाबत एकामागून एक नवीन खुलासे आता होत आहे. या आरोपीची संपूर्ण कुंडली अंगावर काटा आणणारी आहे. आरोपी अर्शदचा हा पहिलाच गुन्हा नाही. याआधीही आग्रा येथे आपल्या मुलीचीही हत्या केली आहे. त्याची पत्नी सध्या कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही,अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.