सायबर सिटी गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या (Divya Pahuja Murder Case) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हत्याकांडाचा तपास सुरू असून या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दिव्याच्या हत्येचा आरोप असलेल्या हॅाटेल मालक अभिजीत सिंगसह तीन आरोपींना गुरुग्राम पोलिसांनी अटक केली आहे. हेमराज आणि ओमप्रकाश अशी आरोपींची नावं असुन हे दोघंही अभिजीतच्या हॅाटेलमध्ये काम करत होते. या सोबत तिन्ही आरोपींनी ज्या कारमधुन दिव्याच्या मृतदेह नेला ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र, पोलिसांना अद्याप तिचा मृतदेह नाही सापडला.
[read_also content=”अमेरिकेत नववर्षाच्या सुरुवातीलाच शाळेत गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, पाच जण जखमी https://www.navarashtra.com/world/one-studdents-died-and-five-injured-in-school-firing-in-america-nrps-495154.html”]
बुधवारी गुरुग्राम पोलिसांना माहिती मिळाली होती की, सेक्टर-14 मधील हॉटेल सिटी पॉइंट येथे एका महिलेचा खून झाला आहे. पोलिसांनी माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता बलदेव नगरमध्ये राहणाऱ्या मॅाडेल दिव्याचा हॉटेलमध्ये खून करून मृतदेह बाहेर कुठेतरी विल्हेवाटीसाठी नेल्याचे तपासात उघड झाले. मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
चौकशी दरम्यान, हॉटेलमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगळवारी रात्री 10.45 वाजता दिव्याचा मृतदेह घोंगडीत गुंडाळून हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये दोन जण ओढत असल्याचे दिसून आले. नंतर एक माणूस परत जाताना दिसले. या सीसीटिव्ही फुटेचच्या माध्यमातुन पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले आणि हॅाटेल मालक अभिजीत सिंगसह तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा मॉडेलिंग करत होती. दिव्याकडे आरोपी अभिजीत सिंगचे काही अश्लील फोटो होते, ज्याच्या मदतीने ती अभिजीतला ब्लॅकमेल करत होती. ती अनेकदा अभिजीत सिंगकडून खर्चासाठी पैसे घेत असे आणि आता तिला मोठी रक्कम उकळायची होती.
2 जानेवारीला आरोपी अभिजीत सिंह हा दिव्या पाहुजासोबत हॉटेल सिटी पॉइंटवर पोहोचला आणि तिला तिच्या फोनमधून अश्लील फोटो डिलीट करायचे होते, पण दिव्याने फोनचा पासवर्ड सांगितला नाही. याचा राग आल्याने त्याने दिव्यावर गोळी झाडली.






