अकोला शहरात एका महिलेला जाळून मारल्याच्या धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि मृत महिलेच्या नातेवाईकांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. जोपर्यंत सर्व आरोपी गजाआड होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. दोन दिवसआधी एका महिलेला निर्घृणपणे जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांसह पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला. “जोपर्यंत सर्व दोषींना अटक होत नाही आणि या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही,” असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मृत महिलेची बहीण आणि भाऊ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. “माझ्या बहिणीची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. यातील मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आमची एकच मागणी आहे की या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी,” असे नातेवाईकांनी यावेळी सांगितले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणातील आरोपींवर कडक कलमे लावून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.