Nalasopara : परफ्यूमवरील तारखा बदलताना बाटल्यांचा स्फोट, पती- पत्नीसह चार जण जखमी (फोटो सौजन्य-X)
नालासोपारा पूर्वेकडील शंखेश्वर नगर भागात असलेल्या एका इमारतीत परफ्यूमवरील तारीख बदलण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला. ही घटना गुरुवारी रात्री ९:४५ च्या सुमारास घडली ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले. या अपघातानंतर शेजारील नागरिकही भयभीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या घटनेचा तपास केला जात असून नेमकं स्फोट होण्याचं कारण शोधण्यात येत आहे.
नालासोपारा पूर्वेकडील शंखेश्वर नगर परिसरात आहे. येथील रोशनी अपार्टमेंट इमारतीतील फ्लॅट क्रमांक ११२ मध्ये वडार कुटुंब राहते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्यूमच्या बाटल्यांवरील तारीख संपली होती. त्यांना बदलण्याचे काम सुरू होते. दरम्यान अचानक एक स्फोट झाला. परफ्यूममध्ये असलेल्या गॅसमुळे झालेल्या स्फोटात घरात उपस्थित असलेले चार जण भाजले आणि जखमी झाले. जखमींची ओळख पटली असून महावीर वडर (४१), सुनीता वडर, हर्षवर्धन वडर (९) आणि हर्षदा वडर (१४) अशी आहे. य घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मुलगा हर्षवर्धनवर नालासोपारा येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर तिघांवर ऑस्कर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
वडर कुटुंबाच्या घरात परफ्यूमची एक्सपायरी झालेल्या तारखा बदलण्याचे काम होत असल्याचे या घटनेवरुन समजते.यावेळी परफ्युमच्या बाटल्यांमध्ये असलेल्या गॅसचा अचानक स्फोट झाला या स्फोटात वडर कुटुंबीय होरपळले गेले. या दुर्घटनेत महावीर वडर (वय ४१ ) पत्नी सुनीता वडर, त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा हर्षवर्धन वडर आणि १४ वर्षांची मुलगी हर्षदा वडर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षवर्धन वडर हा नववर्षाचा मुलगा या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नालासोपारा येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच दुर्घटनेत जखमी अन्य तीन जणांना ऑस्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर दूसरीकडे बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध मोठी कारवाई करताना मुंबई पोलिसांनी महाराष्ट्रातील नालासोपारा भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या १३ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. अनधिकृत स्थलांतरितांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाईचा एक भाग म्हणून घाटकोपर उपनगरात विशेष मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेले लोक योग्य कागदपत्रांशिवाय भारतात आले होते आणि राहिले होते. अटक केलेल्या नागरिकांना हद्दपारीच्या कारवाईसाठी परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयासमोर (FRRO) हजर करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी परदेशी नागरिक कायद्याचे पालन करण्याची गरज अधोरेखित केली, देशातील परदेशी नागरिकांचे प्रभावी निरीक्षण आणि अहवाल सुनिश्चित करण्यात त्याची भूमिका अधोरेखित केली.