नाशिकच्या द्वारका पुलावर भीषण अपघात; लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपची धडक; ६ जणांचा मृत्यू
शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावरुन रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात व्यक्तीला दुचाकीची धडक बसली. यामध्ये या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला एकजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात हरीओम रणजीत गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Teachers Salary : शिक्षकांचा पगार रखडला: अजित पवार ॲक्शन मोडमध्ये: थेट अधिकाऱ्यांना फोन लावला अन्…
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या जित हॉटेल समोरून एक अज्ञात व्यक्ती रस्ता ओलांडत होता. त्यावेळी अहमदनगर बाजूकडून येणाऱ्या एका दुचाकीची (एमएच १६ डीएच ६७१५) इसमाला धडक बसून अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोघांसह रस्ता ओलांडणारा इसम रस्त्यावर पडला. दरम्यान, अज्ञात इसम गंभीर जखमी होत दुचाकीवर पाठीमागे बसलेला विकास शिंदे हा देखील जखमी झाला. यावेळी शेजारील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अज्ञात व्यक्तीचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे घोषित केले.
तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला विकास आजिनाथ शिंदे (वय २३ वर्षे रा. तुळजाभवानी नगर, खराडी, पुणे) हा जखमी झाला असून, याबाबत अमोल बापू नप्ते (वय ३४ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी हरीओम रणजीत गायकवाड (वय १९ वर्षे रा. खराडी पुणे मूळ रा. औरा शहाजणी ता. निलंगा जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर हे करत आहे.
डॉक्टर महिलेचा मृत्यू
उशीर झाल्याने मुलाला शाळेतून आणण्यासाठी गडबडीत निघालेल्या डॉक्टर आईचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कात्रज-हांडेवाडी रस्त्यावर बुधवारी दुपारी हा अपघात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकचालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. प्रणाली तन्मय दाते (वय ३४, रा. व्हीटीपी अर्बन सोसायटी, उंड्री) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक पांडुरंग बलभीम भोसले (वय ३५, रा. तुळजापूर, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली. स्नेहा अनिल कदम (वय ३९,रा. गोदरेज प्राणा सोसायटी, उंड्री) यांनी याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेदेखील वाचा : देशपातळीवरील ‘इंडिया’ आघाडी विसर्जित होणार? महाराष्ट्रातील नाराजीनाट्यमुळे बसणार फटका, नेत्याचे सूचक विधान