Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 20, 2026 | 06:39 PM
Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

Palghar District News: राज्यात महसूल प्रशासनाचा मोठा विस्तार! पालघर, वसई, डहाणूत नवे महसूल केंद्र; नागरिकांचा वेळ व प्रवास वाचणार

Follow Us
Close
Follow Us:

Palghar District News: वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये नव्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे.

त्यासोबत अतिरिक्त तहसीलदार कावाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला र्यालयेही स्थापन केली जाणार आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई आणि डहाणू तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनावरील वाढता ताण, नागरिकांना शासकीय कामांसाठी करावा लागणारा लांबचा प्रवास, जिल्हे व तालुक्यांचा विस्तीर्ण भौगोलिक परिसर तसेच वाढती लोकसंख्या या सर्व बाबींचा सखोल विचार करून राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dahanu News: डहाणू-तलासरी पोलिसांची संयुक्त धडक; २०.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांच्या स्थापनेसाठी संबंधित तालुक्यांची संख्या, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी व दुर्गम भागातील लोकसंख्या, जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर, तालुक्यांतील सर्वात दूरच्या गावांचे सध्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर व प्रस्तावित कार्यालय स्थापन झाल्यास होणारी अंतरातील बचत यांचा अभ्यास करण्यात आला आहे.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचाही विचार प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, अतिरिक्त तहसील कार्यालयांच्या निर्मितीसाठी महसूल मंडळांची संख्या, महसुली गावांची नावे व संख्या, संबंधित भागातील लोकसंख्या, भौगोलिक विस्तार, आदिवासी व दुर्गम क्षेत्रातील महसूल मंडळांची संख्या यांबाबत आढावा घेण्यात आला आहे.

Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

तसेच प्रस्तावित तालुका मुख्यालयापासून सर्वांत दूरच्या गावांचे अंतर आणि नवीन कार्यालय स्थापन झाल्यास नागरिकांचा वेळ व प्रवास कितपत वाचेल याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. पालघर जिल्हयात पालघर, वसई आणि डहाणू तालुक्यासाठी प्रत्येकी एकेक अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती केली जाणार आहे. सोबतच याच तालुक्यांमध्ये अतिरिक्त तहसिलदार कार्यालयेही सुरु केली जाणार आहेत.

वसई तालुक्यासाठी आमदार राजन नाईक यांच्या मागणीवरून अतिरिक्त जिल्हाधिकारी तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातून ठराविक दिवस कामकाज करणार आहेत. या नव्या कार्यालयांमुळे महसूल सेवा अधिक वेगवान, पारदर्शक व लोककेंद्रित होणार असून, विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासनाची दारे अधिक जवळ येणार आहेत. परिणामी, शासकीय कामकाजातील विलंब कमी होऊन प्रशासन गतिमान होण्यास मोठी मदत होणार आहे.

Web Title: Additional collectorate offices in six divisions in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • palghar
  • Vasai-Virar Municipal Corporation

संबंधित बातम्या

Dahanu News: डहाणू-तलासरी पोलिसांची संयुक्त धडक; २०.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
1

Dahanu News: डहाणू-तलासरी पोलिसांची संयुक्त धडक; २०.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.