Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dahanu News: डहाणू-तलासरी पोलिसांची संयुक्त धडक; २०.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

डहाणू तालुक्यात आंबेसरी बारीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त केला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 19, 2026 | 06:00 PM
Dahanu News: डहाणू-तलासरी पोलिसांची संयुक्त धडक; २०.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Dahanu News: डहाणू-तलासरी पोलिसांची संयुक्त धडक; २०.७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Follow Us
Follow Us:

Dahanu News: डहाणू तालुक्यात आंबेसरी बारीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त केला असून एका आरोपीस अटक करून न्यायालयाने त्यास २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई डहाणू व तलासरी पोलिस ठाणे तसेच उपविभागीय पोलिस पथकाच्या संयुक्त सहभागातून पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आंबेसरी बारीपाडा परिसरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणात साठा ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यावेळी वाडीत बाबुलाल जेठारामजी जाठ ही व्यक्ती उपस्थित होती.

हे देखील वाचा: Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

पोलिस उपनिरीक्षक किर्तिकुमार गायकवाड यांनी पंचांना बोलावून घटनास्थळी तपासणी केली असता, राज्यात प्रतिबंधित असलेला केसरयुक्त गोवा पानमसाला, ‘जी-१ जर्दा’ असा तंबाखूजन्य माल साठवल्याचे निष्पन्न झाले. साठा मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच सायंकाळची वेळ झाल्यामुळे सर्व मुद्देमाल पंचासमक्ष आयसर टेम्पोमधून डहाणू पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला. तपासणीदरम्यान गोवा पानमसाल्याच्या एकूण ३० मोठ्या गोण्यांमध्ये विविध आकारांचे पाऊच आढळून आले असून असून प्रत्येकी सुमारे २०० रु. प्रमाणे एकूण किंमत अंदाजे १८ लाख रु. तसेच ‘जी-१ जर्दा’च्या ३० मोठ्या गोण्यांमध्ये प्रत्येकी सुमारे ९ हजार रु. किंमतीचा माल आढळून आला असून त्याची एकूण किंमत सुमारे २ लाख ७० हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

हे देखील वाचा: Vasai Virar Illegal Construction: वसईत अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई; महापौरांचा आक्रमक इशारा

या कारवाईत एकूण २० लाख ७० हजार रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालातून नमुन्याकरिता प्रत्येकी एक पाऊच वेगळा काढून लिफाफ्यात सील करण्यात आला असून त्यावर पोलिस व पंचांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. संपूर्ण पंचनामा ई-साक्ष अॅपद्वारे चित्रीकरण करून करण्यात आला आहे. या प्रकरणी आंबेसरी बारीपाडा येथे आरोपी बाबुलाल जेठारामजी जाठ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किर्तिकुमार गायकवाड करीत आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Banned pan masala case in dahanu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • palghar
  • Tobacco

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.