वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. त्यातच बीडचा बिहार झाल्याची टीका बीडमधील लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षातील नेत्यांकडून केली जात असतानाच बीडमध्ये गेल्या वर्षभरात किती गुन्हे घडले, किती हत्या व हत्येच्या प्रयत्नांची प्रकरणे झाली, याची आकडेवारी पुढे आली आहे. वर्षभरात 40 खून तर हत्येच्या प्रयत्नांचे 191 गुन्हे दाखल झाले आहेत.
हेदेखील वाचा : धक्कादायक! पैशासाठी पत्नीला सोपवले मित्राकडे करू दिला लैंगिक अत्याचार, Live Video पहायचा हा शैतान नवरा
बीड जिल्ह्यात 2024 या वर्षात खूनाचे 40 गुन्हे दाखल झाले असून, खुनाचा प्रयत्न केल्याचे 191 गुन्हे दाखल आहेत. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलीस कारवाईच्या बाबतीत सरस ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्यात पोलीस यंत्रणा सरस ठरली असली तरी हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे वाढल्याचेही दिसून येत आहे.
राज्यातील सरपंच देशमुख हत्याप्रकरणावरुन सध्या बीड जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी असून खंडणी प्रकरणात अटक केलेल्या वाल्मिक कराड याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
परळीतून मिळाले 109 मृतदेह
अंजली दमानिया यांनी बातमीचा संदर्भ देत परळीत मोठ्या प्रमाणावर दहशत असल्याचे म्हटले आहे. तसेच, एकट्या परळीत 109 मृतदेह मिळत असतील तर या जिल्ह्याची स्थिती काय असेल? अशी विचारणा त्यांनी केली. फक्त यामध्ये तिघांची चौकशी व्यवस्थित होताना दिसते बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट होत नसल्याचा आरोप दमानिया यांनी केला. तसेच, इकडे पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर तेथील आमदारांचा आणि वाल्मिक कराड यांचा कंट्रोल आहे, असा आरोपही त्यांनी केला.
पाचगणीत बालबालांचा धिंगाणा
पाचगणीजवळील कासवंड येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) येथे बारबालांचा धिंगाणा चालू असताना पोलिसांनी मारलेल्या छाप्यात २० जणांना ताब्यात घेऊन २४ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सातारा जिल्ह्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळाची बिरुदावली मिरवणाऱ्या पाचगणीत असे अवैध धंदे रोजरोसपाने सुरु असून यावर वचक म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी धडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस दलाला दिल्या होत्या.
हेही वाचा : साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास परिसरातील पार्टीत बारबालांचा नाच; Video Viral, अद्याप कारवाई नाही