
चिनी मांजा विक्रीप्रकरणी ५ विक्रेते ताब्यात (Photo Credit- X)
जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल
या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने कफीलउल्ला फजलउल्ला खान आगि शेयख फरदीन अब्दुल रज्जाक या दोघांना ताब्यात घेतले, या दोघांच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे सात गहू ताब्यात घेण्यात आले. अन्य दुसऱ्या कारवाईत अर्जुन कदम यांच्या पथकाला शहाबाजार येथे एका घरातून प्रतिबंधीत माज्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली, या माहितीवरून शेख फरदीन अब्दुल रज्जाक याच्या घरातून १९९ गहू नायलॉन मांजा जप्त करण्यात आले. तसेच तालेब खान, मुद्दस्सीर नजीर अहमद, या दोघांनाही प्रतिबंधीत मांज्याची विक्री करताना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही प्रकरणात जिन्सी आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून धिंड काढा
शहरात विक्री होणाऱ्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून त्यांची धिंड काढा अशा मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांकडे देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, शहरात नायलॉन आणि चायना मांजामुळे अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. यात लहान मुलांचा गळा कापला जाणे, त्यांना शारीरिक इजा होणे अशा दुर्घटनांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच एका चिमुकल्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. यात ३ वर्षाच्या मुलाच्या गळ्याला मांजामुळे २० टाके पडले तर याच मांजामुळे पोलिस उपनिरिक्षक आणि इतरही नागरिक जखमी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
प्रशासन कमी पडल्याने वाढले प्रकार
उच्च न्यायालयाच्या आदेशानतंरही जीवघेणा नायलॉन मांजा बाजारात येण्यापासून रोखण्यास प्रशासन नेमके कुठे कमी पडत आहेत. उणिवा, आणि समस्या कुठे आहेत आणि कोणत्या उणिवामुळे घटना घडत त्याबाबत तपास करण्याची गरज आहे, हे मांजाचे घोके टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने मांजा विक्रेत्यांचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे. परंतु नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांची छत्रपती संभाजीनगर शहरातून धिंड काढा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, उपाध्यक्ष योगेश उबाळे यांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली आहे.