Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?

ताडीवाला रोड परिसरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 28, 2026 | 12:30 AM
ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?

ताडीवाला रस्ता परिसरात वाद, दोन गटात हाणामारी; नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:
  • ताडीवाला रस्ता परिसरात वाद
  • दोन गटात हाणामारी
  • नेमकं काय घडलं?
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून हाणामाऱ्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ताडीवाला रोड परिसरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) याने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोनू काळे, दस्तूर नदाफ, गणेश काळे, रफीक नदाफ, इस्माइल नदाफ, साहिल नदाफ, भूषण भंडारी (सर्व रा. प्रायव्हेट रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी किरकोळ वादातून घरातील महिलांना मारहाण केली. अजयचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केली, असे भालशंकर याने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.

तर अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) याच्या तक्रारीवरून अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, आम्रपाली अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, दीपाली, रुपाली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रायव्हेट रोड परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्याचा मित्र भूषण भंडारीला मारहाण केली. गीता घाटे यांना मारहाण करण्यात आली, असे काळे याने तक्रारीत म्हटले आहे.

टोळक्याकडून तिघांना दगडाने मारहाण

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चाकण परिसरातील कडाची वाडी येथे भाईगिरीचा आव आणत एका तरुणाला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांना दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (१८ जानेवारी) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बापदेव वस्ती येथील ओमसाई नगर कॉर्नर येथे घडली आहे. या प्रकरणात प्रविण विष्णू कुंभार (४८, बापदेव वस्ती, मेदनकरवाडी) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सयश राजेंद्र यादव, शिवम संदीप हाके, शुभम संदीप हाके (१८, कडाची वाडी), चिन्मय वाघ, सुदर्शन चौधरी, सोन्या वाघमारे आणि विराज कृष्णा कड (२३, कडाचीवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील शुभम हाके आणि विराज कड या दोघांना अटक केली आहे.

Web Title: A clash has taken place between two groups in the tadiwala road area of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Crime News: ५५ कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त! पाचुपतेवाडीत महसूल गुप्तचर विभागाचा मोठा छापा; २२ किलो मेफेड्रोनसह तस्करांचे धाबे दणाणले
1

Crime News: ५५ कोटींचे ‘ड्रग्ज’ जप्त! पाचुपतेवाडीत महसूल गुप्तचर विभागाचा मोठा छापा; २२ किलो मेफेड्रोनसह तस्करांचे धाबे दणाणले

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …
2

Bhopal AIIMS Snatching: भोपाळ AIIMS रुग्णालयात महिला डॉक्टरची लूट; लिफ्टमध्ये आला अन् मंगळसूत्र …

ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…
3

ज्यादा परताव्याच्या आमिषाने दीड कोटींना गंडा; सायबर चोरट्यांनी फसवणूक केली अन् तेच पैसे…

कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी; जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न
4

कंपनी ठेकेदाराच्या बाऊन्सरांकडून महिला शेतकऱ्यांना दमदाटी; जमिनीत बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.