पोलिस ठाण्यात कॉट ट्रीटमेंट ?
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून करण्यात आल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथे गुरुवारी (दि.12) सकाळी आठच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
हेदेखील वाचा : तडीपार गुंडाला शहरात फिरताना पुणे पोलिसांकडून अटक; दहशत पसरवण्यासाठी केले असे काही…
वंदना धनपाल रामटेके (वय 60 रा. कुडेसावली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर धनपाल माधव रामटेके (वय 67) असे आरोपी पतीचे नाव आहे. धनपाल रामटेके मागील अनेक दिवसांपासून गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याचे पत्नी व मुलांसोबत नेहमी वाद होत असत. मोठा मुलगा बाहेरगावी तर लहान मुलगा त्याच्याजवळ राहत होता.
धनपालचे सतत व्हायचे पत्नीसोबत वाद
धनपालचे पत्नीसोबत कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमी वाद होत असत. अशातच गुरुवारी सकाळी पतीने पत्नी वंदनासोबत संशयावरून वाद घातला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात वंदना घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
शेजाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी नेत असताना त्यांच्यासोबतही वाद घातला. घटनेची माहिती कोठारी पोलिसांना गावकऱ्यांनी दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पतीला ताब्यात घेतले व वंदनाला उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टर उपस्थित नसल्याने तिला बल्लारपूर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना महिलेचा वाटेतच मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : बापरे! वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी ‘मेगा’ प्लॅनिंग; कोर्टाकडून १८ आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी