
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे: पुणे राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांची बहीण आणि इतर तीन जणावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर या महिलेने रुपाली पाटील यांच्यावर पोस्ट लिहिली होती. याचा राग मनात धरून रुपाली पाटील यांच्या बहिणीने मला मारहाण केल्याचा वीडियो माधवी खंडाळकर हिने व्हायरल केला होता. मात्र नंतर तिने आमच्यात गैरसमज झाले आणि त्यातून हे झाल्याच म्हटल होत. मात्र काल माधवी खंडाळकर हिने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर रुपाली पाटील यांच्या बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नंतर रुपाली पाटील यांच्या बहिणीने पण तक्रार दाखल केली आणि माधवी खंडाळकर हिच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या सगळ्यांमध्ये चाकणकर असल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे.
कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास
पाटलांच्या बहिणीने मला बेदम मारहाण केली
रुपाली पाटील तिची बहीण आणि भाऊ माझ्याकडे आले आणि मला ओढत मारहाण केली. रक्त बंबाळ होईपर्यंत मला मारल आणि नंतर दबाव टाकून माझ्याकडून वीडियो बनवून घेतला असा आरोप खंडाळकर यांनी केला आहे. खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांनी मला मारहाण करायला लावली. एकीकडे हा आरोप असताना दुसरीकडे रुपाली पाटील यांच्या बहिणीने खंडाळकर यांच्या भावाने अश्लील शिवीगाळ केली. मनाला लज्जा उत्पन्न होईल अस कृत्य केल्याचा आरोप केला आणि त्यानुसार खंडाळकर आणि त्यांच्या भावांवर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुपाली पाटील म्हणतात यामागे चाकणकर
पुण्यात मारहाणीची घटना घडली तेव्हा मी बीडला होते. मात्र माझ्यावर रुपाली चाकणकर यांनी बनाव रचून माझ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर रुपाली पाटील या पोलीस स्टेशनमध्ये बसून होत्या. मी पक्षाचा राजीनाम पण देते असा थेट इशारा त्यांनी दिला होता. मात्र काल पुणे पोलिसांनी दोन्ही बाजूने आलेल्या तक्रारीवर गुन्हे दाखल केले आहेत. या सगळ्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे खंडाळकर यांनी तक्रार दिली होती. खडक पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माधवी खंडाळकरने काय केल होत ?
रुपाली पाटील यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. नंतर ती डिलीट करण्यात आली. मात्र त्या बदल्यात रुपाली पाटील यांच्या बहिणीने माझ्यावर हल्ला केला असा आरोप खंडाळकर यांनी केला. माझा आणि रुपाली चाकणकर यांचा संबंध नाही, मी माझ्या वरील हल्ल्याससाठी न्याय मागत आहे. मला वेळ पडली तर मी राज्य महिला आयोगात जाईन अस खंडाळकर यांनी म्हटल आहे.
Ghaziabad crime: चुलत भावानेच केली अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार; नंतर छतावरून दिलं फेकून