
State Women Commission Chairperson Rupali Chakankar meet the Deepti Magar family in Urali Kanchan
आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव दीप्ती मगर असे आहे. दीप्तीचा विवाह रोशन चौधरी याच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी झाला होता. दोन्ही कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. लग्नाच्या काही महिन्यांतच पती रोशन याने दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तसेच माहेरहून पैसे देखील आणण्यास सांगितले. या मानसिक आणि अर्थिक छळाला कंटाळून दीप्तीने आत्महत्या केली. यानंतर राज्य महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडितेच्या माहेरच्या घरी भेट देत त्यांचे सात्वंन केले.
हे देखील वाचा : “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
रुपाली चाकणकर यांनी मगर कुटुंबाला भेट देत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. तसेच राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यामुळे आरोपींवर कारवाई होत नाही असा आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी केला आहे. यावर चाकणकर म्हणाले की, कुठल्याही महिलेला किंवा लेकीला त्रास झाला तर तिने तातडीने कळवायला हवे. आपण ठामपणे तिच्या पाठीशी आपण उभे राहायला हवे. तुम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यासाठी अनेक पथकं आहेत. सासरी नांदणाऱ्या लेकीला त्रास झाला तर तिच्यासाठी काय? तर तिच्यासाठी काही व्यासपीठ आहेत, असे चाकणकर म्हणाल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, वन स्टॉप सेंटर पासून अगदी तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे काऊंसिलिंग करणे, तिला वकील देण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंतची तिची लढाई लढण्यासाठी मोफत वकील असतात. हे सर्व गोपनिय ठेवलं जातं. अगदी आई-वडिलांशिवाय कोणालाही माहिती नसतं. ती वन स्टॉप सेंटरमध्येही जाऊन तक्रार करु शकते, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिली आहे.
हे देखील वाचा : मन सुन्न करणारी घटना! वाघोलीत आईकडून ११ वर्षीय मुलाची हत्या; मुलीवरही जीवघेणा हल्ला
चाकणकर म्हणाल्या की, “आमची टीम वेगळ्या पद्धतीने काम करते. कायदा हा खूप कठोर आहे. कायद्याच्या चौकटीतून या सगळ्या प्रक्रिया होत राहतात. महाराष्ट्रातील कायदा हा भारतातील सर्वात सक्षम काम करतो. म्हणून तुम्हाला काही शंका असतील तर जरुर सांगा. या आधीचे दोन आरोपी आपल्या पीसीमध्ये आहेत. आपणच आपल्या लेकींच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. आता आपणच ही शपथ घेऊ,” असे रुपाली चाकणकर यांनी आश्वस्त केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील उरळी कांचन येथे दिप्तीच्या सासरच्या लोकांनी “आमच्या वंशाला दिवा हवा, मुलगी नको,” असे म्हणत पाच महिन्यांच्या गर्भातील बाळाचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतला, एवढेच नाही तर हुंड्यासाठी २५ लाख रुपये मागितले. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच मानसिक व शारीरिक आणि आर्थिक छळाला सुरुवात झाली. या सगळ्याला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली आहे. विवाहीत महिला दीप्ती मगर-चौधरी ही इंजिनिअर होती. दीप्तीच्या मनाविरुद्ध जाऊन गर्भलिंग तपासणी केली. दुसरीही मुलगी असल्याचे कळाल्यानंतर तिला गर्भपात करायला लावला.