Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; तपास माळेगाव पोलिसांकडे

पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश प्रतापराव जगताप यांनी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 06:52 PM
पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; तपास माळेगाव पोलिसांकडे

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; तपास माळेगाव पोलिसांकडे

Follow Us
Follow Us:

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश प्रतापराव जगताप यांनी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी मोठी खळबळ उडाली होती.

 

जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याशी तरुणीचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्यांनी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, त्याने पत्नीशी घटस्फोट घेणार असल्याचे खोटे कागदपत्र पीडित तरुणीला दाखवले, त्यानंतर लग्नासाठी महाबळेश्वर मध्ये रिसॉर्ट बुक केले होते, मात्र प्रत्यक्षात पीडित तरुणीशी संपर्क तोडला. त्यामुळे पीडित तरुणीने जिल्हा परिषदेमध्ये येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान संबंधित तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन कदम यांनी याबाबत पत्रकारांना ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा : सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?

जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून २०१२ ते २०२६ दरम्यान पीडित तरुणीशी शरीर संबंध निर्माण केले. तिची आठ ते दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक देखील जगताप याने केली. पीडित तरुणीने पुणे येथील रुग्णालयात दाखल असताना पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली, मात्र घटनास्थळ बारामती तालुक्यातील असल्याने पुणे पोलिसांनी सदर फिर्याद माळेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केली. त्यानुसार माळेगाव पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास माळेगाव पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन घटना

पुण्यात तीन संतापजनक घटना घडल्या आहेत. नांदेड सिटी आणि काळेपडळ पोलिस ठाण्यांत महिलांच्या छळाचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणांत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणे, माहेराहून पैसे, फर्निचर व दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे, मानसिक छळ करणे तसेच तिहेरी तलाक उच्चारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against pune zilla parishad member mangesh jagtap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • baramati
  • crime news
  • NCP News

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
2

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
3

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
4

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.