Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्यासाठी लिंक पाठवून नऱ्हे येथील ३४ वर्षीय व्यक्तीची २ लाख ७९ हजार ७०९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 20, 2026 | 03:22 PM
वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, दररोज वेगवेगळ्या भागात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. अशातच आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्यासाठी लिंक पाठवून नऱ्हे येथील ३४ वर्षीय व्यक्तीची २ लाख ७९ हजार ७०९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. दंड भरण्यासाठी पाठविलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खाते आणि क्रेडिट कार्डशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरील कॉल आणि एसएमएस दुसऱ्या मोबाइल क्रमांकावर फॉरवर्ड करून घेण्यात आले आहे. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करून बँक खाते आणि क्रेडिट कार्डमधून परवानगीशिवाय रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.

 

याप्रकरणी नऱ्हे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार हिरा एंटरप्राइजेसच्या व्हॉट्सअॅप क्रमांकाचा वापर करणारे, विविध बँक खात्यांचे वापरकर्ते तसेच संबंधित लिंकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन ते पाच सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आरोपींनी संबंधित व्यक्तीला त्यांच्या वाहनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगितले. त्यानंतर दंड भरण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारे एक लिंक पाठविण्यात आली. दंड भरण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्तीने त्या लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक केल्यानंतर आरोपींनी बँक खाते आणि क्रेडिट कार्डशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावरील कॉल आणि एसएमएस दुसऱ्या मोबाइल क्रमांकावर फॉरवर्ड करून घेतले. त्यामुळे बँक व्यवहारांशी संबंधित संदेश आणि माहिती आरोपींपर्यंत पोहोचली. त्यानंतर या माहितीचा वापर करून बँक खाते आणि क्रेडिट कार्डमधून परवानगीशिवाय रक्कम हस्तांतरित करण्यात आली. या व्यवहारांमुळे संबंधित व्यक्तीचे एकूण दोन लाख ७९ हजार ७०९ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब

एक एपीके फाइल इन्स्टॉल केली… मोबाइलचा ताबा गेला… आणि काही वेळातच तीन क्रेडिट कार्डावरून ८ लाख ५९ हजार ५९९ रुपये साफ झाले ! गॅस कनेक्शन बंद होणार या एका मेसेजने सुरू झालेल्या फसवणुकीत ५४ वर्षीय डॉक्टरांना सायबर चोरांनी काही तासांत गंडा घातला आहे. ही घटना १२ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान संमित्र कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी तब्बल नऊ महिन्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात मुकेश टिंडुरामजी नाथानी (५४, रा. मंगल जगत, संमित्र कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: A person in pune has been defrauded after being sent a link for a traffic fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • crime news
  • fraud
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
1

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
2

वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…
3

धक्कादायक ! मध्यरात्री बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; इतर प्रवासी झोपेत असताना ‘तो’ जवळ आला अन्…

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट; एक-दोन नव्हेतर तब्बल 80 साक्षीदारांचे नोंदवले जबाब, 5053 पानांचे आरोपपत्र
4

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट; एक-दोन नव्हेतर तब्बल 80 साक्षीदारांचे नोंदवले जबाब, 5053 पानांचे आरोपपत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.