तू मला खूप आवडते, तुला उचलून घेऊन जातो अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यासह देशभरातून दररोज घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. दोन दिवसांपुर्वी (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
घटनेच्या दिवशी तक्रारदार महिला घरात एकटीच होत्या. तेव्हा मुबारक तिच्या घरी गेला. त्याने लगट साधण्याच्या हेतुन त्याने तिला मी तुला पहील्यांदा पाहिले तेव्हापासून तु मला खूप आवडत आहे, असे बोलुन लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरोपीच्या सर्व प्रकाराला नकार दिल्यानंतर आरोपीने तिला तु फक्त सांग मी, तुझ्यासाठी काय करू, तुझ्या नवर्याला घरात घुसुन मारतो व तुला उचलुन घेऊन जातो, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी घरामध्ये शिरला आणि तिचा विनयभंग केला.
विवाहितेवर लैंगिक अत्याचार
विवाहित महिलेशी जवळीक साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२५ ते १९ ऑगस्ट २०२५ दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जियान नावाच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेने आरोपीला विरोध केल्यानंतरही आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबईत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली पूर्व परिसरामध्ये नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला दहावीच्या परीक्षेमध्ये नापास करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व घडत होत. पीडित मुलगी आरोपीचा छळ निमूटपणे सहन करत होती. पण पीडितेच्या आईला संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.