मोहोळ : वैद्यकीय शारीरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेलेल्या एका पिढीतेशी तपासणीदरम्यान अश्लील वर्तन केल्याचा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पिढीतेने मोहोळ पोलिस ठाण्यात डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ जून रोजी मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे घडली. पीडितेच्या तक्रारीनुसार, वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करताना मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील शिरापुरसो येथे असलेल्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पीडिता वैद्यकीय शारीरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र आणण्यासाठी दि. २१ जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर अमित रमेश गायकवाड वय ४२ रा. शिरापुर ता. मोहोळ याने संबंधित पीडितेची हातातील स्टेथोस्कोपने तपासणी करत असताना त्या पीडीतेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. संबंधित पीडितेने यासंदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात त्या डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे .अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्णेवाड करत आहेत.
पीडितेने डॉक्टरच्या कृत्याबद्दल पालकांकडे तक्रार केली. त्यानंतर पालक संबंधित डॉक्टरकडे जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने सुरुवातीला उडवाउडवी केली. मात्र पिडीता व तिचे पालक तसेच इतर नातेवाईक डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने स्वतःच रुग्णालयातील खोलीचे दार बंद करून घेतले. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरला गेट उघडायला लावून मोहोळ पोलीस ठाण्यात आणले. या घटनेमुळे मात्र मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा शिरापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चर्चेत आले आहे.
लॉजच्या नावाखाली कुंटनखाना; पोलिसांची धाड
अर्जूनसोंड पाटी ( ता मोहोळ ) येथील आर्यन लॉजच्या नावाखाली चालू असलेल्या कुंटनखाण्यावर पोलिसांनी धाड टाकून एक पिडीत महिलेची सुटका करून दोघांना अटक केली. याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड पाटी येथील आर्यन लॉज येथे कुंटनखान्या प्रमाणे महिलांचा वापर केला जातो, अशी खबर पोलिसांना मिळाली होती यानुसार सुरेखा अशोक शिंदे वर्षे ३१, पोलीस उपनिरीक्षक, नेमणूक – महिला सुरक्षा शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण. यांच्या पथकाने याठिकाणी धाड टाकली.
यावेळी एक पिडीत महिले कडून तिला पैशाचे आमीष दाखवून तिच्या कडून वेशा व्यवसाय करवून घेतला जात होता. तीची पोलिसांनी मुक्तता केली तर आर्यन लॉजचा मॅनेजर पंकज भास्कर पवार वय २९ वर्षे राहणार ढोकबाभूळगाव, लॉजचा वेटर रामचंद्र पांडुरंग भालेराव वय ३५ रा अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेवर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5,6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Web Title: A doctor molested a woman while a brothel was set up under the name of a lodge