फोटो सौजन्य – X
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सध्या 2 सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना संपला आहे हा सामना अनिर्णयित राहिला. या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याने सलग दोन डावांमध्ये शतक नावावर केले आहेत. त्याच्या या कामगिरीने क्रिकेट चाहत्याचे लक्ष वेधले आहे. क्रिकेटची क्रेझ ही जगभरामध्ये पसरली आहे. बांगलादेशने आपला दुसरा डाव घोषित केला आणि श्रीलंकेला (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश) २९६ धावांचे लक्ष्य दिले, परंतु श्रीलंकेने सावध फलंदाजी करून सामना अनिर्णित राखला.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील गॉल येथे खेळलेला पहिला कसोटी सामना कदाचित अनिर्णित राहिला असेल, परंतु सामन्यादरम्यान असे काही क्षण होते जे सामन्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवून देत होते. २१ जून रोजी, एक आश्चर्यकारक दृश्य पाहण्यात आले जिथे एक चाहता हा सापांसोबत सामना पाहण्यासाठी आला होता, ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
IND VS ENG 3rd Day Weather Report : आज पाऊस खेळ खराब करणार? वाचा असा असेल हवामानाचा कल
गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना) एक आश्चर्यकारक दृश्य दिसले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्टेडियमच्या बाहेर एक सर्पमित्र त्याच्या सापांसह उपस्थित होता. त्याच्या समोर तीन टोपल्या होत्या, त्यापैकी दोन टोपल्यांमध्ये कोब्रा साप होते. त्याने एका सापाला हातात धरले होते. त्याच्यासोबत एक लहान माकडही होते. ही घटना (SL vs BAN viral moment) पहिल्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २१ जून २०२५ रोजी सकाळच्या सत्रात पाहण्यात आली.
A Snake Charmer spotted in Galle 🐍🐒
Watching Sri Lanka vs Bangladesh Test with snakes wrapped around and a monkey by his side.
Only in Sri Lanka 🇱🇰 — the most unique cricket fans in the world! 😂❤️#SLvsBAN #CricketFans #GalleTest pic.twitter.com/pMDGNlW5nY
— Sourabh Kumar (@iamsourabh1818) June 21, 2025
बांगलादेश संघाने पहिल्या डावात ४९५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल यजमान श्रीलंकेचा संघ ४८५ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावाच्या आधारे बांगलादेशला १० धावांची आघाडी मिळाली. यानंतर, दुसऱ्या डावात ६ बाद २८५ धावा करून बांगलादेशने डाव घोषित केला.