आत्महत्येपूर्वी सेल्फी, व्हॉट्सॲपवर मित्राला पाठवली चिठ्ठी; त्यानंतर पती-पत्नीने गंगेत घेतली उडी
‘कर्जात पुरते बुडालोय, हफ्ते भरुन भरुन कंटाळलोय. आता आम्ही अजून हफ्ते भरू शकत नाही. त्यामुळे मृत्यूकडे स्वतः सोपवतोय. जिथून कुठूनही आत्महत्या करू, तिथून सेल्फी पाठवू.”अशी नोट लिहून कर्जबाजारीपणाला कंटाळून सौरभने पत्नी मोनासोबत हरिद्वारमध्ये गंगेत उडी मारून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दोघांनी शेवटचा सेल्फी घेतला, नंतर त्यांनी सेल्फी आणि सुसाईड नोट त्यांच्या मित्राच्या व्हॉट्सॲपवर पाठवला. गंगेत उडी मारण्यापूर्वी या जोडप्याने आपल्या कुटुंबीयांनाही बोलावले होते.
ही घटन उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये राहणाऱ्या सौरभचे किशनपुरा येथे दागिन्यांचे दुकान आहे. परंतु बराच काळ हा व्यवसाय तोट्यात होता. दरम्यान, त्यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज झाले होते. त्याने चालवलेल्या चार-पाच समित्यांवरही पैसे भरण्याची वेळ आली होती (आपापसात पैसे जमा करून नंतर हप्त्यावर कर्ज घेणे). मात्र सौरभकडे पैसेच शिल्लक नव्हते. दुसरीकडे वसुलीसाठी कर्जदार घरी येऊ लागले. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून सौरभने पत्नीसह आत्महत्या केली.
हे सुद्धा वाचा: CBI करणार कोलकातामधील डॉक्टर तरुणी हत्येचा तपास, उच्च न्यायालयाचे आदेश
दरम्यान समिती पद्धतीत सर्व सभासदांकडून समान रक्कम घेतली जाते, टोकन दिले जातात आणि बोली लावली जाते. ज्याचे टोकन आधी येते त्याला व्याजावर जमा केलेले पैसे मिळतात. ते निर्धारित कालावधीत परत करावे लागेल. मात्र सौरभला समितीचे पैसे परत करता आले नाहीत. सौरभने जवळपास 5 समित्या चालवल्याचं सांगण्यात येत आहे. एका समितीमध्ये 200 सदस्य होते आणि प्रत्येक सदस्याला ₹ 2000 चा हप्ता होता. सर्व समित्यांचा कार्यकाळ संपल्याने लोकांना पैसे द्यावे लागले. दायित्वाची रक्कम कोटींवर पोहोचली होती.
गंगेत उडी मारण्यापूर्वी सौरभ बब्बरने आपल्या मित्राला व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे –
‘कर्जात पुरते बुडालोय, हफ्ते भरुन भरुन कंटाळलोय. आता आम्ही अजून हफ्ते भरू शकत नाही. त्यामुळे मृत्यूकडे स्वतः सोपवतोय. जिथून कुठूनही आत्महत्या करू, तिथून सेल्फी पाठवू.” आत्महत्या करण्यापूर्वी सौरभ बब्बरने त्याच्या घरी शेवटचा फोनही केला होता, ज्याचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कॉलमध्ये सौरभ म्हणत आहे की, आमचा व्हिडिओ सर्वांना दाखवा, आम्ही हरिद्वारमध्ये आहोत आणि आमचे जीवन संपवत आहोत. येथून उडी मारणार आहे.
हे सुद्धा वाचा: माझ्यासोबत चल, मी तुला कॉलेजमधून घरी सोडतो…, 21 वर्षीय तरुणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नगर कोतवाली भागातील किशनपुरा येथे राहणारा सौरभ बब्बर याचे याच परिसरात ज्वेलर्सचे दुकान होते. सौरभ बब्बर रविवारी रात्री पत्नी मोना बब्बरसोबत हरिद्वारला गेला होता. सोमवारी त्यांचा मृतदेह गंगा कालव्यातून सापडला. पत्नी मोना अद्याप बेपत्ता आहे. सौरभकडे लोकांकडून भरपूर पैसे होते आणि त्याच्यावर खूप कर्ज होते. त्याला दोन मुले आहेत, ज्यांना त्याने मृत्यूपूर्वी आपल्या आजी-आजोबांच्या घरी सोडले. मात्र, त्यावेळी हे जोडपं एवढं मोठं पाऊल उचलणार हे कोणालाच माहीत नव्हतं. या घटनेनंतर कुटुंबीयांची दुरवस्था झाली असून रडत आहे. निरागस मुलांचे चेहरे पाहून कुटुंबीयांना आपले अश्रू आवरता येत नाहीत. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 7 वर्षाच्या मुलाने वडील सौरभ बब्बर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.