Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

बरेलीच्या बिशरतगंज भागात एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 22, 2025 | 01:09 PM
17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार; न्यायालयाने आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह देशभरात अल्पवयीन तरुणींवरील अत्याचाराच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांमुळे तरुणींमध्ये रस्त्याने एकटे जाताना भिती निर्माण होत आहे. पोलिसही तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊले उचलत आहेत. मात्र तरीही अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील बिशरतगंज भागात ही कारवाई केली आहे. स्थानिक न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

१७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार

सहाय्यक जिल्हा सरकारी वकील प्रवीण कुमार सक्सेना म्हणाले की, २० ऑगस्ट रोजी, विशेष पोक्सो न्यायाधीश कुमार मयंक यांनी २१ वर्षीय विकास यादवला १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याबद्दल शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला २८,००० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

घटना दोन वर्षांपूर्वी दिल्लीत घडली

ही घटना १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली. जेव्हा विकासने मुलीचे अपहरण केले, तिला दिल्लीला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. बिशरतगंज पोलिस ठाण्याने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

देशात दररोज अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे प्रकार उघडकीस येत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, असे दिसून येते की आरोपी हा कुटुंबातील जवळचा व्यक्ती असतो ज्यावर निष्पाप व्यक्तीला सर्वात जास्त विश्वास असतो. अशा परिस्थितीत, गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे हे प्रत्येक वेळी महत्त्वाचे असते.

फॅमिली फ्रेंडने केले संतापजनक कृत्य

गेल्या काही दिवसाखाली एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील भरती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. २०१९ साली फिर्यादी त्यावेळी केवळ १९ वर्षाची होती. तेव्हापासून हा अत्याचार सुरु होता. आरोपी व फिर्यादीचं कुटुंब चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आरोपी सतत फिर्यादीच्या घरात ये-जा करायचा. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.

Web Title: The court has sentenced the accused who tortured the young woman to a heavy sentence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • Court
  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

आमदारासमोर तलाठ्याचे तर्राट कारनामे! मद्यधुंद अवस्थेत काहीच सुधरेना; पुढे जे काही झालं…
1

आमदारासमोर तलाठ्याचे तर्राट कारनामे! मद्यधुंद अवस्थेत काहीच सुधरेना; पुढे जे काही झालं…

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…
2

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा ‘या’ तारखेला होणार लिलाव
3

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा ‘या’ तारखेला होणार लिलाव

कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास
4

कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.