Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Airport Customs Raid: मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! ३ दिवसांत अडीच किलो सोनं आणि ८ किलो ‘ड्रग्ज’ जप्त

Mumbai Airport News: मुंबई विमानतळावर कस्टम्सने ३ दिवसांत २.५ किलो सोनं आणि ८.४ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केले. बँकॉक आणि दुबईहून होणारी मोठी तस्करी रोखली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 17, 2025 | 09:01 PM
मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! (Photo Credit- X)

मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई एअरपोर्टवर कस्टम्सचा मोठा विळखा
  • सोनं आणि हायड्रोपोनिक वीडची तस्करी रोखली
  • कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत
मुंबई: मुंबई विमानतळ कस्टम्स विभागाने गेल्या तीन दिवसांत (१५ ते १७ डिसेंबर) तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. या कारवाईत कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी सुमारे २.५ किलो सोने आणि ८.४ किलो हायड्रोपोनिक वीड (अतिउच्च दर्जाचा अमली पदार्थ) जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत कोटींच्या घरात आहे.

८.४६ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

सर्वात मोठी कारवाई अमली पदार्थांच्या विरोधात झाली. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून ८.४६७ किलो हायड्रोपोनिक वीड जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे ८.४६ कोटी रुपये आहे. या प्रवाशाला एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

मेणाच्या गोळ्यांमध्ये सोन्याची तस्करी

पहिली घटना: माले (मालदीव) येथून दुबईमार्गे येणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला पकडण्यात आले. तो विमानतळावरील कर्मचाऱ्याला (BWFS स्टाफ) मेणामध्ये लपवलेली १.४६० किलो सोन्याची पावडर सोपवत होता. याची किंमत १.८६ कोटी रुपये आहे. BWFS कर्मचाऱ्यांना देताना पकडण्यात आले. हे प्रवासी इंडिगोच्या फ्लाइट्स ६E-११३२ (डिसेंबर १६) आणि ६E-१४५१ (डिसेंबर १७) मध्ये प्रवास करत होते. दोघांनाही १९६२ च्या कस्टम्स कायदा कलम १०४ अंतर्गत अटक करण्यात आली.

हे देखील वाचा: मुंबई विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात १,०३६ एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स ची नोंद; प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ!

दुसरी घटना: दुबईहून बँकॉकला जाणाऱ्या एका भारतीय नागरिकाला ८१० ग्रॅम सोन्याचे डस्ट (किंमत ₹१.०३ कोटी) देताना पकडण्यात आले. तो इंडिगोच्या फ्लाइट्स ६E-१४५४ (डिसेंबर १६) आणि ६E-१०५१ (डिसेंबर १७) मध्ये प्रवास करत होता. येथेही, प्रवासी आणि BWFS कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

दागिने लपवून तस्करी

१६ डिसेंबर रोजी, इंडिगो फ्लाइट ६E-१२६८ मधून मस्कतहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला त्याच्या पाकिटात आणि अंगावर २३० ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट आणि चेन लपवून ठेवल्याचे आढळले. ब्रेसलेटची किंमत अंदाजे २९.३६ लाख रुपये आहे.

कडक कारवाईचा इशारा

मुंबई कस्टम्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत अंदाजे ३.१९ कोटी रुपये आहे. तस्करीच्या या आंतरराष्ट्रीय रॅकेटला चपराक बसवण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सोने आणि अमली पदार्थांच्या तस्करीबाबत ‘झिरो टॉलरेंस’ (शून्य सहनशीलता) धोरण कायम राहील, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा: Navi Mumbai: गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या! नवी मुंबई पोलिसांची धडक मोहीम; अमली पदार्थ तस्करांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

Web Title: A major operation by customs at mumbai airport 25 kg of gold and 8 kg of drugs seized in 3 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 09:01 PM

Topics:  

  • Drug Case
  • Gold Smuggling
  • mumbai airport

संबंधित बातम्या

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video
1

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली लिओनेल मेस्सीला भेटणार? दिसले मुंबई विमानतळावर; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.