Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पैशासाठी पोलिसांचा बनाव करून तरुणाचे अपहरण; बळजबरीने कारमध्ये नेले अन्…

पोलिस असल्याचे भासवून तरुणाचे अपहरण करून मारहाण करत पैशांची मागणी करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 07:30 PM
पैशासाठी पोलिसांचा बनाव करून तरुणाचे अपहरण; बळजबरीने कारमध्ये नेले अन्...

पैशासाठी पोलिसांचा बनाव करून तरुणाचे अपहरण; बळजबरीने कारमध्ये नेले अन्...

Follow Us
Close
Follow Us:
  • पैशासाठी पोलिसांचा बनाव करून तरुणाचे अपहरण
  • लोहगाव पोलिसांच्या समयसूचकतेमुळे गंभीर प्रकार टळला
  • आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
पुणे : पोलिस असल्याचे भासवून तरुणाचे अपहरण करून मारहाण करत पैशांची मागणी करणाऱ्या आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, लोहगाव पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे संभाव्य गंभीर प्रकार टळला, असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी किरण उनवणे (रा. बोल्‍हेगाव, जि. अहिल्यानगर) याच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदिप शंकर डोंगरे (वय ३४, रा. मोझेनगर, लोहगाव) यांनी लोहगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार मोझेनगर येथील साई कृपा बिल्डिंग तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बोल्हेगाव येथे घडला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तीन दिवसांपुर्वी (दि. २३ फेब्रुवारी) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संदिप हे त्यांच्या मोझेनगर येथील घरी होते. तेव्हा पाच अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरात शिरले. त्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगत डोंगरे यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मोबाईल ताब्यात घेत बळजबरीने कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले. आरोपींनी त्यांना लोहगाव येथील सृष्टी हॉटेलच्या मागील बाजूस नेऊन पुन्हा मारहाण केली. त्यानंतर आरोपी किरण उनवणे हिनेही मारहाण करत डोंगरे यांना कारमध्ये बसण्यास भाग पाडले.

कमरेला लावलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवत, संबंधित महिलांचे पैसे दिले नाहीस तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपींनी डोंगरे यांना बोल्‍हेगाव येथे नेले. तेथेही त्यांना मारहाण करून पैशांसाठी तगादा लावला. “पैसे दिले नाहीत तर तुझा गेम करून टाकेन,” अशी धमकीही देण्यात आली. या प्रकारातून सुटका झाल्यानंतर डोंगरे यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींच्‍या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला

शिलाई मशिनच्या नावाखाली लाखो उकळले

प्राथमिक चौकशीत डोंगरे मूळचे अहिल्यानगर येथील असून, त्यांनी शिलाई मशीन देण्याच्या नावाखाली काही महिलांकडून लाखो रुपये गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मशीन न देता ते पुण्यात आले होते. डोंगरे यांच्या अपहरणाची माहिती शेजाऱ्यांनी आधीच पोलिसांना दिली होती. मात्र घरी परतल्यानंतर डोंगरे यांनी अपहरण झाले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणाचा पुढील तपास लोहगाव पोलिस करीत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचा एक नातेवाईक अहिल्यानगर येथील स्थानिक नगरसेवक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Web Title: A shocking incident of a young man being kidnapped for money has been revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अविमुक्तेश्वरानंदला कधीही होऊ शकते अटक? वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचाराबाबत धक्कदायक माहिती समोर
1

अविमुक्तेश्वरानंदला कधीही होऊ शकते अटक? वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचाराबाबत धक्कदायक माहिती समोर

धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं
2

धक्कादायक ! थेट घरात घुसून शिक्षकाचे अपहरण; दुचाकीवर बसवून नेलं अन् नंतर बेदम मारलं

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना
3

Accident News: भीषण ट्रक अपघात चालकाचा मृत्यू; राजापूरमधील घटना

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत
4

उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांना दिलासा मिळणार? सकारात्मक निर्णयाचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.