Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रिण दुसर्‍यासोबत फिरताना दिसली म्हणून तिचा जबडाच केला फ्रॅक्चर; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मैत्रिण दुसर्‍यासोबत फिरताना दिसल्यानंतर चिडलेल्या मित्राने तिला दुसऱ्यासोबतच तुझा जाण्याचा संबंध काय ? अशी विचारणा करत तिला जबर मारहाण करून जबडा फ्रॅक्चर केल्याचा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2024 | 12:17 PM
मैत्रिण दुसर्‍यासोबत फिरताना दिसली म्हणून तिचा जबडाच केला फ्रॅक्चर; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मैत्रिण दुसर्‍यासोबत फिरताना दिसल्यानंतर चिडलेल्या मित्राने तिला दुसऱ्यासोबतच तुझा जाण्याचा संबंध काय ? अशी विचारणा करत तिला जबर मारहाण करून जबडा फ्रॅक्चर केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर येथील मॉडल कॉलनी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी रोहन जग्गन्नाथ कदम (वय २७, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदीराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी येथे राहणार्‍या २३ वर्षीय तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तरूणी आणि रोहन कदम हे मित्र- मैत्रीण आहेत. परंतु, दिवाळीपासून ते काही कारणावरून एकमेकांशी बोलत नव्हते. दोन दिवसांपुर्वी (दि. ९ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तरूणी त्याच्या दुसऱ्या एका मित्रासोबत दुचाकीवर जात असताना रोहन याने पाहिले. याचवेळी रोहनने तिला थांबवुन तु कोठे चालली आहेस, अशी विचारणा केली. दुसर्‍या सोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय सबंध आहे ? असे म्हणत वाद घातला. तसेच, त्याने हाताने बुक्यांनी चेहर्‍यावर गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तरूणीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर तरुणीने पोलिसांकडे त्याची तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : …अन् डावच फसला! सिक्युरिटी अलार्म वाजताच एटीएममध्ये छेडछाड करणाऱ्या चोरट्याला पकडले

जगभरात महिलांवरील अत्याचाराविरुद्ध अनेक कायदे असले तरी सार्वजनिक ठिकाणी आणि घरातही महिलांवरील अत्याचारांमध्ये घट झालेली नाही. पुण्यातही गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली बाणेर येथील टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या मित्र आणि त्याच्या मैत्रिणीला बेदम मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली. त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

रविवारी सायंकाळच्या सुमारास अबिनियू चवांग आणि त्यांची मैत्रीण चिंगमलाई पामेई हे बाणेर येथील टेकडीवर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी १८ ते २० वयोगटातील चार जणांच्या टोळक्यांणे त्या दोघांना अडवले. त्यांना शस्त्राचा धाक दाखवत मारहाण बेदम केली. ते बदमाश एवढ्यावरच नाही थांबले, तर त्यांनी चिंगमलाईच्या करंगळीवर शस्त्राने वार केला. त्यात तिच्या कारंगळीला मोठी जखम झाली. मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल, इअर बड, तसंच अन्य साहित्य चोरी करून ते चौघे पसार झाले.

Web Title: A young man has beaten up his girlfriend in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 12:17 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर
1

Maharashtra 1st Conclave : महाराष्ट्र ‘ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था’ बनू शकेल का? मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्लॅन? वाचा सविस्तर

Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट
2

Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट

Pune crime : प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी तरुणाचा काटाच काढला; नेमकं काय झालं?
3

Pune crime : प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी तरुणाचा काटाच काढला; नेमकं काय झालं?

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.