Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

दिवाळीचा सण, घराघरांत आनंदाचे वातावरण आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याची लगबग सुरू असतानाच वणी तालुक्यातील मंदर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चारगावजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 12, 2026 | 12:30 AM
दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला! भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • भरधाव ट्रकच्या धडकेत २७ वर्षीय योगेश बुचेचा मृत्यू
  • दिवाळीच्या दिवशी चंद्रपूरकडे जाताना काळाचा घाला
  • अपघातामुळे मंदर गावावर शोककळा
वणी : दिवाळीचा सण, घराघरांत आनंदाचे वातावरण आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याची लगबग सुरू असतानाच वणी तालुक्यातील मंदर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चारगावजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. योगेश रवींद्र बुचे असे मृत तरुणाचे नाव आहे. दिवाळीच्या सणाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने बुचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

 

वडिलांसोबत चंद्रपूरकडे जाताना अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बुचे हा खासगी पशुवैद्यकीय कर्मचारी म्हणून कार्यरत होता. दिवाळीच्या दिवशी सकाळी तो आपल्या वडिलांसोबत दुचाकीने चंद्रपूरकडे जाण्यासाठी घरातून निघाला होता. चारगाव चौकीजवळील पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर त्यांनी पुढील प्रवास सुरू केला. याचदरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, योगेशचा गंभीर अपघात होऊन जागीच मृत्यू झाला. डोळ्यांदेखत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांवर दुःखाचा मोठा आघात झाला.

दिवाळीच्या आनंदावर शोककळा

दिवाळीच्या सणानिमित्त कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची वेळ असताना बुचे कुटुंबाला मुलाच्या मृत्यूचे दुःख सहन करावे लागत आहे. अवघ्या २७ वर्षांच्या योगेशच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मंदर गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : दिवाळीच्या फटाक्यांवरून तुफान राडा! तरुणीचा विनयभंग अन् कुटुंबीयांना मारहाण; नेमकं काय घडलं?

अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या अपघातामुळे वणी तालुक्यातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. तालुक्यातून कोळसा वाहतूक तसेच अन्य मालवाहू ट्रकची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अनेक मार्गांवरून भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वणी तालुक्यात अपघात कुठे आणि कधी झाला?

    Ans: वणी तालुक्यातील चारगावजवळ दिवाळीच्या दिवशी सकाळी हा भीषण रस्ते अपघात झाला.

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: योगेश रवींद्र बुचे (वय २७, रा. मंदर) असे मृत तरुणाचे नाव असून, तो खासगी पशुवैद्यकीय कर्मचारी म्हणून कार्यरत होता.

  • Que: हा अपघात नेमका कसा झाला?

    Ans: योगेश हा वडिलांसोबत दुचाकीने चंद्रपूरकडे जात असताना चारगाव चौकीजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात योगेशचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: A young man has died after being hit by a speeding truck nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • maharashtra

संबंधित बातम्या

एका अक्षराच्या चुकीमुळे ‘या’ गावातील शेतकरी दिवाळी मदतीपासून वंचित; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
1

एका अक्षराच्या चुकीमुळे ‘या’ गावातील शेतकरी दिवाळी मदतीपासून वंचित; प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक
2

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक

 Bus Accident: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच काळाचा घाला! भीषण बस अपघाताने प्रशासनात खळबळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितल…
3

 Bus Accident: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच काळाचा घाला! भीषण बस अपघाताने प्रशासनात खळबळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितल…

Bhaubij 2026 : भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? जाणून घ्या खास कारण
4

Bhaubij 2026 : भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? जाणून घ्या खास कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.