
पूर्वीच्या भांडणाच्या रागातून मित्रावर वार
कराड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. पूर्ववैमनस्यातून हल्लेही होत आहेत. असे असताना आता कराडमध्ये पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मित्राने मित्रावर धारदार शस्त्राने वार केला. मंगळवार पेठेत गुरूवारी (दि.19) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी सायंकाळी मंगळवार पेठेत सहा वाजण्याच्या सुमारास मित्रांमध्ये पूर्वीच्या भांडणाच्या रागातून वाद सुरू झाला. या वादातून एकाने मित्रावरच कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केला. यावेळी तेथे असणाऱ्या अन्य मित्रांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोयत्याचा वार एकाच्या पाठीत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
हेदेखील वाचा : Boyfriend ने गाडीत केली शारीरिक संबंधाची इच्छा, नंतर विवस्त्र अवस्थेत तिच्यासोबत जे घडलं ते…, भयंकर प्रकार समोर
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. या घटनेतील दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी वार करणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
पिंपरीतही धारदार शस्त्राने हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत कोयत्याने (धारदार शस्त्र) हल्ला करून ३ लाख ८० हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही खळबळजनक घटना 2 डिसेंबर रोजी रात्री चिंचवड येथील केशवनगर परिसरात घडली होती.
कासारवाडीतही हल्ल्याची घटना
कासारवाडी परिसरात एका तरुणावर किरकोळ कारणावरून तिघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे. “आमच्याकडे रागाने का बघतोस?” असा जाब विचारत आरोपींनी पीडित तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
हेदेखील वाचा : गायब झालेले रणदिवे बदलीच्या ठिकाणी रवाना; पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती