Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पसरणी घाटात भीषण अपघात; दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार, दोघांचा मृत्यू

जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. अक्षय मस्कु काळभोर व सौरभ जालिंदर काळभोर अशी या दोघांची नावे आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 14, 2025 | 08:06 AM
पसरणी घाटात भीषण अपघात; दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार, दोघांचा मृत्यू

पसरणी घाटात भीषण अपघात; दोनशे फूट खोल दरीत कोसळली कार, दोघांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

वाई : पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चारचाकी फोर्ड एन्डेव्हर गाडीचा अपघात झाला. यामध्ये ही कार सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण लोणी काळभोर (पुणे) येथील आहेत.

महाबळेश्वरवरून वाईकडे येताना पसरणीच्या घाटात बुवासाहेब मंदिरानजीक, पालखी रस्त्याजवळ हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लोणी काळभोर येथील बजरंग पर्वतराव काळभोर, सौरभ जालिंदर काळभोर, अक्षय मस्कू काळभोर, वैभव काळभोर हे सर्व एन्डेव्हर कार (एमएच १२ क्यूटी ७७११) गाडीने कोकणामध्ये फिरण्यासाठी गेले होते. गुरुवारी सकाळी महाबळेश्वर येथे काहीवेळ फिरून माघारी पुण्याला जात होते. त्यावेळी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बुवासाहेब मंदिराच्या खालील बाजूस पालखी रस्त्यानजीक कार सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळली.

यावेळी मोठा आवाज झाला. घटना घडल्यानंतर थोड्या वेळातच घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले. शिवसह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने व स्थानिक युवक पसरणीचे माजी उपसरपंच विशाल शिर्के, गणेश शिर्के, अजय शिर्के, अमोल महांगडे, प्रवीण शिर्के, आबा होमणे, अक्षय मोहिते, मोहित काकडे आदींनी जखमींना स्ट्रेचरवरून दोनशे फूट दरीतून वर काढले.

अपघातात दोघांचा मृत्यू; दोन जखमी

जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. अक्षय मस्कु काळभोर व सौरभ जालिंदर काळभोर अशी या दोघांची नावे असून, बजरंग पर्वतराव काळभोर व वैभव काळभोर हे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी व हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.

होळी पौर्णिमेच्या दिवशीच अपघात

होळी पौर्णिमेच्या दिवशी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सिद्धनाथवाडी वाई येथील शिव सह्याद्री रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी व वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खोल दरीतून दोरखंडाच्या साह्याने बाहेर काढले. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिली. त्यामुळे घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Accident in pasrani ghat car falls into a 200 foot deep gorge nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 08:06 AM

Topics:  

  • Accident News
  • Satara Accident

संबंधित बातम्या

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
1

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
2

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी
3

म्हसवडजवळ भीषण तिहेरी कार अपघात; एकाचा मृत्यू तर नऊजण जखमी

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर
4

माळशेज घाटात एसटी बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात; जखमींचा आकाडाही आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.