Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी

घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 02, 2025 | 08:58 AM
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, पाचजण गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

Samruddhi Highway Accident News:  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी (१ फेब्रुवारी) रात्री या महामार्गावर सिन्नरजवळ एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारचा ताबा सुटल्याने ती साईड अँगलला धडकली. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी रत्नागिरी येथील असून, ते प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला आणि देवदर्शनासाठी गेले होते. समृद्धी महामार्गाने परतत असताना त्यांना हा दुर्दैवी अपघात झाला.

रत्नागिरी येथील सात जण कारने प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे, ते समृद्धी महामार्गाने घरी परतत असताना वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलढोण शिवारात सकाळी सुमारे सहाच्या सुमारास त्यांच्या कारवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे ती पुढील वाहनावर धडकली.

‘…त्यावेळी शरद पवारांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली’; छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली
या भीषण अपघातात रत्नागिरी माळनाका येथील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई (६९), अथर्व किरण निकम (२४) आणि चालक भाग्यवान झगडे (५०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच निवृत्त सहाय्यक निबंधक किरण निकम (५८), रमाकांत पांचाळ (६०), रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज (५०) आणि प्रांजल प्रकाश साळवी (२४) हे जखमी झाले आहेत.  किरण निकम यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षा उपाय अधिक कडक करण्याची गरज असल्याची मागणी होऊ लागली आहे.

मासिक पाळी, गर्भाशयाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ फुलाच्या चहाचे नियमित

Web Title: Accident on samruddhi highway two dead five seriously injured nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • Accident on Samruddhi Highway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.