केळफूलाच्या चहाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना, अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा, रजोनिवृत्ती, हार्मोनल संतुलन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या खचून जातात. महिलानांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यात काहींना काही बदल होत असतात. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक महिलांना असहाय्य वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकल मधून आणून गोळी घेतात. मात्र हे उपाय करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी केळफुलाच्या चहाचे सेवन करावे. नैसर्गिक घटकांनी समृद्ध असलेले केळफूल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा आढळून येतात. प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी गुणधर्मांनी समृद्ध असलेले केळफूल महिलांच्या आरोग्यासाठी वरदान आहे. चला तर जाणून घेऊया शरीराला होणारे इतर फायदे.
केळफूलाच्या चहाचे सेवन केल्यामुळे मासिक पाळी नियमित होते. याशिवाय मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. अनियमित पाळी, जास्त रक्तस्राव किंवा पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी या चहाचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायटोन्यूट्रिएंट्समुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि मासिक पाळीचे चक्र सुधारते. याशिवाय या फुलामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म गर्भाशयाच्या स्नायूंना आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. मासिक पाळीचा त्रास वाढू लागल्यास आठवड्यातून दोनदा केळफूलाच्या चहाचे सेवन करावे.
केळफूलाच्या चहाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी केळफुलाच्या चहाचे सेवन करावे. प्रामुख्याने महिलांच्या शरीरात अनेकदा हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. अशावेळी शरीरात सतत अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केळफूल अतिशय प्रभावी आहे. केळफूलामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. मासिक पाळीमध्ये होणारा अति रक्तस्त्राव नियंत्रणात ठेवण्यासाठी या फुलाचा चहा प्रभावी आहे.
दिवसभरातून किती वेळा चेहरा स्वच्छ करावा? जाणून घ्या फेसवॉश करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत
कामाच्या धावपळीमुळे महिलांना अनेकदा आरोग्याकडे लक्ष द्याल वेळ मिळत नाही. यामुळे सतत काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे महिलांच्या शरीरात मानसिक तणाव निर्माण होतो. मानसिक तणाव निर्माण झाल्यानंतर अनेक समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केळफूलाच्या चहाचे सेवन करावे. नियमित केळफूलाच्या चहाचे सेवन केल्यास मानसिक तणाव कमी होईल.