
crime (फोटो सौजन्य: social media)
कोपरगावाजवळ नगर- मनमाड महामार्गावर रात्री भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. खाजगी बस आणि कारची भीषण धडक झाली. या धडकेत कारणे पेट घेतला आणि यात कारचालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहे. या अपघातानंतर हायवेवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, वाहतूक कोंडी झाली होती. मुजाहिद शेख (वय 31) असे मृत चालकाचे नाव असून त्याच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Kalyan Crime: शाळेतून घरी आली आणि…,14 वर्षीय मुलीने 19व्या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?
कसा झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती जवळ काल रात्री 10 च्या सुमारास भीषण अपघात घडला.
एमएच 01 क्यूसी 3516 क्रमांकाची लक्झरी बस ही कोपरगाव येथून येवलाच्या दिशेने जात होती. मात्र ती बस भास्कर वस्तीजवळ येताच समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. कारने लगेच पेट घेतला आणि मोठी आग लागली. कारचालक मुजाहिद शेख हा कारचालक मुजाहिद शेख हा गाडीतच अडकला आणि आगीमुळे होरपळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात बस मध्ये असलेल्या काही प्रवाशी देखील जखमी झाले.
अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश
अपघात होताच प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला. अपघाताची माहिती समजताच कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अग्निशामक दल तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु केले. अखेर एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर दोन्ही पथकांनी संयुक्तपणे काम करत त्या कारची आग विझवण्यात यश आले. परंतु त्या कारच्या आगीत कारचालकाचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोपरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
Ans: नगर-मनमाड
Ans: मुजाहिद
Ans: एक