Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप सुरू आहे सांगितले आणि…; ज्येष्ठ महिलेसोबत केले असे काही…

खरेदीच्या निमित्ताने सराफी दुकानात आलेल्या जोडप्याने ३ लाख रुपये किंमतीचे दागिणे चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनकवडी येथील ३६ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 01, 2024 | 09:49 PM
Crime News: लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप सुरू आहे सांगितले आणि...; ज्येष्ठ महिलेसोबत केले असे काही...

Crime News: लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप सुरू आहे सांगितले आणि...; ज्येष्ठ महिलेसोबत केले असे काही...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याच्या बतावणीने चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हडपसर भागात ही घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत. तीन दिवसांपूर्वी त्या सकाळी अकराच्या सुमारास हडपसर भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले.

आमचे साहेब लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करत आहेत. चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले आणि मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने चोरले. त्यानंतर चोरटा पसार झाला. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत.
शहरात मोफत साडी, पैसे वाटप करण्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. स्वारगेट भागात चोरट्यांनी एका महिलेकडील ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली.

येरवड्यात तरूणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले

येरवड्यातील सादलबाबा चौक परिसरात पहाटे तरुणाला कोयत्याच्या धाकाने लुटल्याची घटना घडली. तरुणाचा २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि १ हजार ६५० रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी गेसुराज जगन्नाथ पाटील (वय २१, रा.जयजवान नगर येरवडा) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण पहाटेच्या वेळी घरातून कामावर जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून दोघे आरोपी आले. त्यांनी तरुणाला सादलबाब चौकाच्या परिसरात गाठले. त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच अ‍ॅपमधून पैसे काढून घेतले. अधिक तपास सहायक निरीक्षक साळुंके करीत आहेत.

हेही वाचा: Pune Crime News: येरवड्यात तरूणाला कोयत्याचा धाक दाखवला अन्…; आरोपींचा शोध सुरू

सराफी पेढीतून ३ लाखांचे दागिने चोरले

खरेदीच्या निमित्ताने सराफी दुकानात आलेल्या जोडप्याने ३ लाख रुपये किंमतीचे दागिणे चोरून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनकवडी येथील ३६ वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी एक अनोळखी महिला आणि पुरूष अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सातारा रोडवर सराफी दुकान आहे. मंगळवारी (दि २६) सकाळी पावने बारा वाजण्याच्या सुमारास एक महिला व एक पुरूष खरेदीच्या निमित्ताने दुकानात आले. दरम्यान, त्यांनी बोलण्यात गुंतवून तीन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस काऊंटरमधून चोरी केला. पुढील तपास सहायक निरीक्षक सागर पाटील करत आहेत.

शहरात सराफी दुकानात खरेदीच्या निमित्ताने येऊन दागिने चोरीच्या घटना वाढीस लागल्या असून, सिंहगड रोड येथे पुन्हा दोन घटना घडल्या आहेत.  धायरी येथील ओम ज्वेलर्स आणि वडगाव बुद्रुक येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात या घटना घडल्या आहेत. चोरटे दुकानात आले आणि सोन साखळी पाहण्यास मागून त्या गळ्यात घालून दुचाकीवर धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

Web Title: Accused looted senior citizen at 80 thousand rs about ladki bahin yojna hadapsar pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 09:49 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Pune

संबंधित बातम्या

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
1

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
2

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
3

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
4

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.