Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: लाभ बंद झाल्याने बजेट कोलमडले; ९१ लाख अपात्र महिलांच्या प्रश्नावर सरकार काय निर्णय घेणार?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा विषय आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अनेक महिलांनी आपल्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनाची आखणी केली होती

  • By anuradha sagar
Updated On: Nov 19, 2026 | 04:25 PM
Ladki Bahin Yojana Update Maharashtra, Ladki Bahin Yojana eKYC Restart

Ladki Bahin Yojana Update Maharashtra, Ladki Bahin Yojana eKYC Restart

Follow Us
Follow Us:
  • लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या ९१ लाखांहून अधिक महिलांना पुन्हा लाभ देण्याची मागणी
  • कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या शिष्टमंडळाची अदिती तटकरेंकडे मागणी
  • अचानक लाभ बंद झाल्यामुळे कष्टकरी व गरजू महिलांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या ९१ लाखांहून अधिक महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा’ काढून महिलांचा प्रश्न सरकारसमोर मांडण्यात आला होता. याच अनुषंगाने महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबई येथे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत सविस्तर चर्चा केली.

लाडकी बहीण योजनेतील पात्र व गरजू महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा, e-KYC किंवा तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी द्यावी, निराधार, विधवा व परित्यक्त्या महिलांसाठी मदतीच्या रकमेत वाढ करावी, तसेच असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांना योजनेत प्राधान्य द्यावे, अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

Dadar Station Renaming : दादर स्टेशनच्या नामांतराविरोधात मनसेनंतर ठाकरे गटही मैदानात! आमदार महेश सावंत यांनी मांडली

यावर मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेतील महिलांना केवायसी पुन्हा सुरू करणे बाबत सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. अनेक महिलांचे अर्ज प्राप्त होत आहेत याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन तटकरे यांनी दिले. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, अनिल चौरे, सखाराम केदार,लाला राठोड उपस्थित होते.

यावेळी काशिनाथ नखाते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा विषय आहे. या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अनेक महिलांनी आपल्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनाची आखणी केली होती. मात्र, अचानक लाभ बंद झाल्याने त्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट करणे आवश्यक आहे.

IMD Career Guide: हवामानशास्त्रज्ञ बनायचंय? १२ वी नंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा? जाणून घ्या

यापूर्वीही मागील महिन्यात राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासोबत या प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती. पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे एकही महिला लाभापासून वंचित राहू नये, ही महासंघाची भूमिका आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाचा संघर्ष व शासनाकडे पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील, असेही नखाते यांनी सांगितले.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने मागणी काय?

    Ans: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या ९१ लाखांहून अधिक पात्र व गरजू महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा आणि e-KYC पुन्हा सुरू करावी, या मागणी केली

  • Que: e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी काय सांगितले?

    Ans: लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असून, अनेक महिलांचे अर्ज प्राप्त होत असल्याने याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिले.

  • Que: निवेदनात इतर कोणत्या महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत?

    Ans: तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी देण्यासोबतच निराधार, विधवा व परित्यक्त्या महिलांसाठी मदतीच्या रकमेत वाढ करावी आणि असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांना प्राधान्य द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Ladki bahin yojana disqualified women reinstatement demand as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार
1

Congress Leader Gaurav Kumar Attack: काँग्रेस नेत्यावर भरदिवसा अज्ञातांकडून गोळीबार; राष्ट्रीय महामार्गावर थरार

Shaina NC Replied to Thackeray: मणिशंकर अय्यर यांचा फोटो हजारदा फाडेन, शायना एनसी यांचा ठाकरेंवर पलटवार
2

Shaina NC Replied to Thackeray: मणिशंकर अय्यर यांचा फोटो हजारदा फाडेन, शायना एनसी यांचा ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: लातूरमध्ये कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याचे घर सील

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा
4

Satara Politics: आगे आगे देखो, होता है क्या…; सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.