crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
नांदेड शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड शहरातील पोलीस आणि आरोपीमध्ये रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता तेव्हा गुन्हेगाराने चक्क पोलिसांवर रिवाल्वर रोखली. पोलिसांनी देखील त्याला प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यात आरोपी पसार झाला आहे. नांदेड शहरातील कौठा भागात हा थरार घडला आहे.
कर्करोग झाला म्हणून प्रेयसी सोडून गेली, बदला घेण्यासाठी प्रियकर चेतनने रचला घातक कट
मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सुरज सिंह गाडीवाले हा नांदेड शहरातील कौठा परिसरात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कौठा परिसरात पोहोचले. तेव्हा सराईत गुन्हेगार सुरज सिंघ गाडीवाले कारमधून आला. मात्र पोलीस आल्याची त्याला कुणकुण लागली आणि त्याने गाडी पळवली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने पाठलाग केला तेव्हा आरोपी सूरज सिंघ गाडीवाले याने आपल्या जवळील गावठी पिस्टल काढली. त्याला उत्तर म्हणुन पोलिसांनी फायरिंग केली.
कुख्यात दहशतवादी सोबत संबंध असल्याचा संशय
दरम्यान, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला आहे. त्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे. आरोपी सुरज गाडीवाले हा रेकॉर्डवरचां गुन्हेगार आहे. त्याचे कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा सोबत संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे त्याला अटक करणं हे पोलिसांपुढेच आव्हान असणार आहे.
संभाजीनगर हादरलं! गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरुन जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरून वाद झाला असतांना एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर एन-6 भागातील संभाजी कॉलनीतील घडली आहे.
मृतकाचे नाव प्रमोद पाडसवान असे असून त्यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान आणि प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान गंभीर जखमी झाले.या प्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाव निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.