Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

जळगावमध्ये कॉलेज प्राचार्यांच्या कथित मारहाणीच्या नैराश्यातून 20 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोट सापडली असून प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू आह

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 08:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • फार्मसी कॉलेजमधील 20 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
  • प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्याचा आरोप
  • विद्यार्थ्याने कुटुंबीयांना अन्याय झाल्याची माहिती दिली होती
जळगाव: जळगाव शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव श्याम प्रभाकर पाटील (२० वर्ष) असे आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्याने प्राचार्यच नाव लिहून ठेवलं. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संबंधित प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबीयांना दिली माहिती

श्याम पाटील हा जळगाव येथील श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी प्राचार्य योगेश पवार यांनी दोष नसताना पीव्हीसी पाईपने मारहाण करून शिक्षक व मित्रांसमोर अपमान केल्याची माहिती श्यामने आपल्या कुटुंबियांना दिली होती. त्यांनतर १४ फेब्रुवारीला रोजी त्याने वडिलांना व काकांना फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगितले होते. यांनतर नेहरूनगर येथील राहत्या खोलीवर त्याने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

सुसाईड नोट मध्ये काय?

श्यामने आत्महत्या करण्या पूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती सुसाईड नोट जप्त केली असून त्यात प्राचार्यांनी मारहाण केली आहे. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राचार्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विध्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जळगावमध्ये भीषण अपघात, अर्टिका कारचा चेंदामेंदा; दोघांचा जागीच मृत्यू तर…

जळगाव जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आढळल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात अर्टिका गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे समोर आले आहे. यात अपघातात दोन जण ठार तर तीन जण जखमी आहे. ही घटना चोपडा-विरवाडा रस्त्यावर घडली.

नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज (16 फेब्रुवारी) सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अर्टिका (MH 19 BS 1008) या गाडीचा भीषण अपघात झाला. घटनेची माहितीमिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकवर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव शहरातील फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

  • Que: आत्महत्येचं कारण काय सांगितलं जातंय?

    Ans: प्राचार्यांनी मित्रांसमोर मारहाण व अपमान केल्यामुळे आलेलं नैराश्य हे कारण असल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: सुसाईड नोट जप्त करून प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime unable to bear the insult in college the student took an extreme step his life journey ended by hanging himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
1

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
2

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
3

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप
4

Kalyan News: मुलांसाठी खाऊ आणायला गेली अन् उघड्या वीजवाहिनीने घेतला जीव; पतीचा पोलिसांवरही गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.