Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: हॉस्टेल वादाचे रूपांतर खुनात! 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोकसून हत्या

लातूर शहरात हॉस्टेलमधील वादातून 21 वर्षीय विद्यार्थी विक्रम पांचाळ याची चाकूने भोसकून हत्या झाली. औसा रोडवरील घटनेनंतर परिसरात तणाव पसरला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 08:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हॉस्टेलमधील किरकोळ वादातून दोन गटांत मारामारी
  • विक्रम पांचाळवर चाकूने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
  • घटना औसा रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी घडली
लातूर: लातूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्यांचे चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. होस्टमध्ये झालेल्या वादामुळे तरुणांच्या दोन गटात वाद झाला आणि त्यातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव विक्रम पांचाळ (२१ वर्ष) असे आहे. ही घटना औसा रोडवरील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय घडलं नेमकं?

विक्रम पांचाळ हा लातूरमध्ये शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत होता. पुराणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारीचा रूपांतर हत्येत झालं. हाणामारीचा रूपांतर विक्रम पांचाळ याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत विक्रमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांनाच त्याचा मृत्यू झाला. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहे.

परिसरात तणाव

विक्रम पांचाळ तो लातूर जिल्ह्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. तो शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत होता. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागिरकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत

लातूर जिल्ह्यात जळकोट पोलिस स्टेशन हद्दीतील धामनगाव येथे रात्रीच्या वेळी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करत छडा लावला आहे. या प्रकरणात दोन सराईत चोरट्यांना अटक करून सुमारे ८० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धामनगाव येथील घरफोडीप्रकरणी जळकोट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय करण्यात आले. ७ फेब्रुवारी रोजी पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून पिवळसर रंगाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली.

 

 

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थी कोण होता?

    Ans: विक्रम पांचाळ (वय 21), तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी.

  • Que: हल्ल्याचे कारण काय?

    Ans: हॉस्टेलमधील किरकोळ वादातून दोन गटांत भांडण झाले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन संशयितांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Latur crime hostel dispute turns into murder 21 year old youth stabbed to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
2

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.