Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: पत्ता विचारण्याचा बहाणा आणि थेट ॲसिड हल्ला; सहावीतील मुलीचा उजवा डोळा आणि…, मुलगी गंभीर जखमी

अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अज्ञात तरुणाने ॲसिड हल्ला केला. शाळेतून घरी जाताना ही घटना घडली. मुलगी जखमी असून उपचार सुरू आहेत, तर आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 08:52 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शाळेतून घरी जाताना विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला
  • चेहऱ्यावर गंभीर इजा; मुलगी उपचाराधीन
  • आरोपी फरार; पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे शोध
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाकडून ॲसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीच्या थेट चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. यात ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात वडगाव पान येथे घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

घरापासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत पीडित मुलगी सहावी इयत्तेत शिक्षण घेत होती. ती रोज शाळेत सायकलने जायची. शाळा सुटल्यानंतर घरी जात असतांना एका अज्ञात व्यक्ती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पीडितेच्या जवळ आला आणि थेट तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. घराजवळील रस्त्यावर कमी घर असल्याने आरोपीने कृत्य केल्याचं दिसून येतंय.

भोसरीत पोलिसांची मोठी कारवाई; शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

पीडित मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. हल्ला करणारा आरोपी अनोळखी असल्याची पहिली प्रतिक्रिया मुलीने दिली आहे. मुलीच्या लीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा झाली आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांनी आरोपीला पकडून कडक शासन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. वडगावपानमधील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होणार आहे.

या घटनेने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीला पकडण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस सीईटीव्हीची तपासणी करत आहे. आरोपीला शोधण्याचा काम शर्तीवर सुरु आहे.

मुलीचा चेहरा ७% भाजला- रुपाली चाकणकर

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आज सकाळी सहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी शाळेनंतर घरी जात असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. सायकल वरून घरी येणाऱ्या मुलीला रस्त्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्यात आलं. 11.30 ते 11.45 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. नागरिकांनी जखमी मुलीला डॉक्टर जम्बुकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले नंतर लोणी इथल्या रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याचे बाजूने 7 टक्के भाजलेला आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सांगितले. जखमी असलेल्या मुलीकडे पोलिसांनी प्राथमिक विचारपूस केली आहे आणि उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीचा जबाब, प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेली माहिती या सगळ्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू केला आहे. मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथे ही तपास सुरू केला आहे. मी स्वतः या प्रकरणातील संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क साधून तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिल्या.

गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात वडगाव पान परिसरात ही घटना घडली.

  • Que: हल्ला कसा झाला?

    Ans: अज्ञात व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला अडवून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले.

  • Que: मुलीची प्रकृती कशी आहे?

    Ans: मुलीच्या उजव्या डोळ्याजवळ इजा झाली असून ती उपचाराधीन आहे आणि प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Ahilyanagar crime pretext of asking for directions leads to acid attack sixth grade girls right eyeand moredamaged victim critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या
1

Mumbai Crime News : मोहरम मिरवणुकीत खळबळ! ‘पेन किलर’च्या नावाखाली वाटल्या उंदीर मारण्याच्या विषारी गोळ्या

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट
2

Ketan Agrawal Case: 17 कोटींचा पॅलेस आणि चार्टर्ड विमानांच्या बातम्यांवर सियाच्या वडिलांचा खुलासा; सांगितलं लग्नाचं खरं बजेट

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव
3

Sangli Crime: पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, पोलिसांनी उघड केला बनाव

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ
4

Jalgaon Crime: उधारीचे पैसे परत न मिळाल्याचा आरोप; आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओने वाढली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.