Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff: आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात टायगर सुरक्षित असून, मुंबई पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणारी सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 19, 2026 | 12:48 PM
आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात

आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात
  • मुंबई पोलिसांनी सुरत एक्स्प्रेसमधून संशयितांना घेतलं ताब्यात
  • दोन्ही संशयित आरोपी आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही
Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्या कारवर मुंबईतील जुहू परिसरात रविवारी (१८ ऑक्टोबर २०२६) सायंकाळी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. जुहू येथील पुष्पा नरसी पार्क परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगरच्या कारच्या दिशेने गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुरक्षित बचावला. मात्र, त्याचा वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी असून या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली असून, हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा दावा तपासला जात आहे.

दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केला गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्क येथे फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. तेथून कारने घरी परतत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कारवर गोळीबार केला. यावेळी परिसरात चाहत्यांची गर्दी होती. अचानक गोळीबार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्…; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

टायगर सुरक्षित; वाहनचालकासह दोघे जखमी

या हल्ल्यात टायगर श्रॉफला गोळी लागली नाही. मात्र, त्याचा वाहनचालक फिरदौस याच्या हाताला दुखापत झाली. तसेच घटनास्थळाजवळील आणखी एक व्यक्ती जखमी झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील अटक आरोपींची नावे

1. फूल सिंह (वय १७) — हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील बडोदा थुथन येथील रहिवासी.
2. ऋतिक कुमार उर्फ रोशन (वय २२) — मूळचा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील पिपराई गावचा रहिवासी. सध्या अंधेरी पश्चिम, मुंबई येथे वास्तव्यास. रॅपिडो रायडर म्हणून काम करतो.
3. रेहान (वय १८) — हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील ईदगाह कॉलनी परिसरातील रहिवासी.

आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव?

हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी टायगर श्रॉफच्या घरासह तो नियमित फुटबॉल खेळण्यासाठी जात असलेल्या मैदानाची रेकी करण्यात आली. अभिनेत्याच्या येण्या-जाण्याच्या वेळा, त्याच्या वाहनाचा मार्ग आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्था यांची माहिती आरोपींनी आधीच गोळा केली होती का, याचा पोलीस तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या हालचालींवर काही दिवसांपासून नजर ठेवण्यात आली होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांना टायगर कोणत्या वेळी फुटबॉल मैदानावर येतो आणि तेथून कधी बाहेर पडतो, याची पूर्वकल्पना होती का, याचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि संशयितांच्या प्रवासाच्या हालचालींचा आधार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काही संशयित गुजरातच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. राजस्थानमधील कोटा पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, संबंधित संशयितांचा प्रत्यक्ष हल्ल्यात किती सहभाग आहे, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.

टायगर श्रॉफच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ; गोळीबारासाठी गावठी पिस्तुलाचा वापर केल्याचा संशय

टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वांद्रे येथील कार्टर रोड परिसरातील त्याच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच अभिनेत्याच्या घराजवळील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलाचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक फॉरेन्सिक तपासात या शस्त्राबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र, नेमके कोणते शस्त्र वापरण्यात आले, याबाबत अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भरवस्तीत प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर गोळीबार झाल्याने मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. हल्लेखोरांना शस्त्रे कोणी पुरवली, त्यांनी आधीपासून रेकी केली होती का आणि हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.

Tiger Shroff: टायगरवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावला ‘बिग बॉस’ विजेता; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव

💡

Frequently Asked Questions

  • Que: टायगर श्रॉफवर गोळीबार कुठे आणि कधी झाला?

    Ans: रविवारी, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्कजवळ टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला.

  • Que: टायगर श्रॉफ गोळीबारात जखमी झाला का?

    Ans: टायगर श्रॉफला गोळी लागलेली नाही आणि तो सुरक्षित आहे. मात्र, त्याचा वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे.

  • Que: टायगर श्रॉफवरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात आहे का?

    Ans: बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमधून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. मात्र, पोलिसांकडून या दाव्याची अधिकृत पडताळणी सुरू आहे.

Web Title: Tiger shroff alleged firing attack juhu mumbai police investigation bishnoi gang sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai Police
  • police
  • tiger shroff

संबंधित बातम्या

हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्…; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
1

हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्…; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त
2

MD Drugs Case: एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! प्रकाश पवारसह दोघांना बेड्या; ९.२ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त

Tiger Shroff: टायगरवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावला ‘बिग बॉस’ विजेता; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव
3

Tiger Shroff: टायगरवरील हल्ल्यातून थोडक्यात बचावला ‘बिग बॉस’ विजेता; अभिनेत्याने सांगितला थरारक अनुभव

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट
4

Tiger Shroff Attack: मुलगा टायगरवरील हल्ल्यानंतर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया; प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.