
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं काय घडलं?
प्राथामिक माहितीनुसार, राम खाडे हे मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते. राम खाडे त्यांच्या सहकाऱ्यांसह गाडीतून जात होते. त्यावेळी दहा ते पंधरा जणांची टोळी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूर घेऊन गाडी थांबवली आणि हल्ला चढवला. सुरुवातीला या हल्लेखोरांनी गाडीची नासधूस केली. त्यानंतर हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. तसेच गाडीचे साईड मिरर फोडले. यानंतर धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्यावर हल्ला केला. राम खाडे यांनी काही वार हातावर झेलले. परंतु, इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. रामखडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले.
वाळू तस्करीवर सरकारचा मोठा घाव! पुनरावृत्ती करणाऱ्यांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द
प्रकृती चिंताजनक
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर सुरुवातीला अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची शुद्ध पूर्णपणे हरपली होती. त्यांचा हात रक्तबंबाळ झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना अहिल्यानगरमधील रुग्णालयातून तातडीने पुण्यात हलविण्यात आले. तिथे त्यांचा उपचार सुरु आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही
या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. राम खाडे यांच्यावर हल्ला कोणी केला, हे अद्याप कळू शकलेले नाही.
जखमी सहकारी यांनी केले आरोप
हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे.
Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?
Ans: 10–15 जणांनी गाडी थांबवून लाठी, तलवार, पिस्तूल व सत्तूराने थेट हल्ला केला.
Ans: प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यात उपचार चालू आहेत.
Ans: जखमी सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हल्ला राजकीय द्वेषातून आणि भ्रष्टाचार उघड केल्याच्या बदल्यात करण्यात आला.