
Cyber Fraud News: बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरे सायबर फसवणुकीचा शिकार; बँक खात्यातून परदेशातून झाले ६ व्यवहार!
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून एकामागोमाग एक तब्बल ६ वेळा संशयास्पद व्यवहार झाले. या सहा व्यवहारांतून ऐश्वर्यच्या खात्यातून एकूण १९,०१५ रुपये डेबिट (कमी) झाले. विशेष म्हणजे, हे सर्वच्या सर्व व्यवहार परदेशातून झाल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ऐश्वर्य ठाकरे यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे व्यवहार करण्यासाठी कार्ड क्लोनिंग, खात्याची माहिती चोरीला जाणे किंवा इतर कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, ऐश्वर्यने अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘निशांची’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून, या सायबर फसवणुकीमुळे तो चर्चेत आला आहे.
मुंबईपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधूनही एक मोठी सायबर फसवणुकीची घटना समोर आली आहे. येथील सातारा परिसरात राहणारे ७४ वर्षीय वृद्ध नागरिक दिलीपकुमार बिश्वनाथ घोष यांच्या बँक खात्यावर सायबर चोरट्यांनी नजर ठेवली होती. चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ‘रिमोट ॲक्सेस’ मिळवून बँक खाती आणि क्रेडिट कार्डवरून परस्पर मोठे आर्थिक व्यवहार केले.
१४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते ११ वाजून ५० मिनिटांच्या दरम्यान हा प्रकार घडला. कोणतीही ओटीपी न सांगता किंवा लिंकवर माहिती न भरता त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ३० हजार ४६३ रुपये परस्पर वळते करण्यात आले. याप्रकरणी संभाजीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली असून सायबर पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अशा घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
Ans: ३० ऑक्टोबर रोजी रात्री ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून परदेशातून ६ वेळा संशयास्पद व्यवहार झाले, ज्यातून एकूण १९,०१५ रुपये डेबिट झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
Ans: संभाजीनगरमधील ७४ वर्षीय दिलीपकुमार बिश्वनाथ घोष यांच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळवून सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून आणि क्रेडिट कार्डवरून ७ लाख ३० हजार ४६३ रुपये लांबवले.
Ans: कोणतीही ओटीपी (OTP) न देता किंवा लिंकवर क्लिक न करता परस्पर खात्यातून पैसे काढले जात असल्याचे या दोन्ही घटनांवरून स्पष्ट होते.