Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई

दुबईत वास्तव्यास राहून चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारीत ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील मुख्य सूत्रधाराला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 02, 2026 | 06:02 PM
दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई

दुबईत बसून सायबर फसवणुकीचे रॅकेट चालविणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात; इंटरपोलच्या मदतीने पोलिसांची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • दुबईतून मुख्य सूत्रधार सुमंत दसरे याला अटक
  • १५७ हून अधिक बँक खात्यांचा सायबर फसवणुकीसाठी वापर
  • सायबर पोलिसांची इंटरपोलच्या मदतीने कारवाई
पिंपरी : दुबईत वास्तव्यास राहून चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारीत ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील मुख्य सूत्रधाराला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. इंटरपोलच्या मदतीने त्याला दुबईतून ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले आहे. सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे आरोपीचे नाव असून, त्याने आतापर्यंत १५७ हून अधिक बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

 

बॅंक खाती ऑपरेट करणारे सापडल्याने भांडाफोड

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(४), ३१७(२), ६१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात सायबर फसवणुकीसाठी बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या टोळीचा तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांना तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. मोरे वस्ती, चिखली रोड) याच्याबाबत माहिती मिळाली. तो साथीदारांच्या मदतीने बँक खाती उघडून त्यामध्ये सायबर फसवणुकीची रक्कम स्वीकारत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तुषार चौधरी आणि आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) यांना अटक करून तपास केला. त्यावेळी या दोघांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडून त्यांची माहिती दुबईत राहणाऱ्या सुमंत ऊर्फ नानू दसरे याला दिल्याचे निष्पन्न झाले. या खात्यांमध्ये सायबर फसवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर तुषार आणि आदर्श हे चेकद्वारे पैसे काढत असत. त्यातील कमिशन स्वतःकडे ठेवून उर्वरित रक्कम सीडीएमद्वारे सुमंतने दिलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जात होती.

चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी

सुमंत हा सुरुवातीला दुबईमध्ये सहा हजार पगारावर शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडसाठी कॉलिंग व मेसेजिंगचे काम करत होता. त्याने चिनी आरोपींकडून वेगवेगळी आंतरराष्ट्रीय कार्ड मिळवून ती मॉल आणि अन्य ठिकाणी स्वाइप करून महागड्या वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली. या कामादरम्यान त्याला सायबर फसवणुकीच्या संपूर्ण कार्यपद्धतीची माहिती झाली. त्यानंतर त्याने चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी करून फसवणुकीचे गुन्हे सुरू केले.

एलओसी आणि इंटरपोलच्या मदतीने दुबईतून ताब्यात

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी आरोपीची माहिती मिळवली. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी त्याच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर (एलओसी) जारी केले. या एलओसीच्या आधारे इंटरपोलच्या मदतीने सुमंत याला दुबईत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला भारतात डिपोर्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात अटक केली.

हे सुद्धा वाचा : कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुबईतून अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) असे आरोपीचे नाव आहे. त्याला इंटरपोलच्या मदतीने दुबईतून ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले.

  • Que: आरोपी सुमंत दसरे याने सायबर फसवणुकीसाठी किती बँक खात्यांचा वापर केला?

    Ans: तपासात सुमंत याने १५७ हून अधिक बँक खात्यांचा वापर करून सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • Que: आरोपी सुमंत दसरे याचे चिनी सायबर गुन्हेगारांशी काय संबंध होते?

    Ans: सुमंत याने दुबईत चिनी सायबर गुन्हेगारांसोबत भागीदारी करून ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालवले. शेअर ट्रेडिंग आणि टास्क फ्रॉडच्या माध्यमातून त्याला सायबर फसवणुकीच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाली होती.

Web Title: The police have arrested the mastermind behind a fraud racket nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • cyber crime

संबंधित बातम्या

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…
1

Harassment Case Pune: दरवर्षी दिवाळीला मागायचे ५ ते १० तोळे सोने! सासरच्या छळाला कंटाळून महीलेची आत्महत्या…

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात
2

सोनगावात अवैध दारू व्यवसायाचा पर्दाफाश; हातभट्टीसह साहित्य पोलिसांच्या ताब्यात

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!
3

Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी
4

Nagpur News : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सराफा व्यापाऱ्यांना धमकी; १० लाखाची मागितली खंडणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.