
crime (फोटो सौजन्य: social media)
नेमकं प्रकरण काय?
६ मे २०१९ रोजी किशनराव हुंडीवाले हे एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते. त्यावेळी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. याघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तब्बल १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात ७ वर्षांनी सुनावणी पार पडली.
एक हजारहून अधिक कागदपत्रांचा आरोपपत्र
या हत्याकांडाचा तपास सुरुवातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केला. नंतर बालापूर येथील सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान हत्येशी संबंधित साक्षी, तांत्रिक पुरावे आणि विविध कागदपत्रांच्या आधारे एक हजारहून अधिक कागदपत्रांची सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस आणि विश्वासार्ह पुरावे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अशा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती
१० दोषींना जन्मठेप,
आज अंतिम सुनावणीत न्यायालयाने १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर ५ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. श्रीराम गावंडे यांच्यासह रणजीत गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर आणि दिनेश राजपूत या दहा आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
समाधान व्यक्त
या निकालामुळे हुंडीवाले कुटुंबियांसह गवळी समाजात समाधान व्यक्त केले जात आहे. यावर आता मुंबई न्यायालयाच्या खंडपीठ नागपूर येथे आरोपी पक्षाकडून निर्णयाच्या विरोधात अपील करणार असल्याची माहिती समोर आली.
कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण
Ans: 6 मे 2019 रोजी अकोल्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात.
Ans: 10 आरोपींना जन्मठेप, तर 5 आरोपी निर्दोष मुक्त.
Ans: दोषी आरोपी नागपूर खंडपीठात अपील दाखल करण्याची शक्यता.