Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जागा ठरली! ‘या’ स्मशानभूमीत होणार दफनविधी

बदलापूर बरोबरच अंबरनाथमध्ये अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी विरोध केला. स्मशानभूमी बाहेर त्याबाबतचे बॅनरही झळकले. आता मात्र आता अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2024 | 03:51 PM
अखेर अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जागा ठरली! 'या' स्मशानभूमीत होणार दफनविधी

अखेर अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जागा ठरली! 'या' स्मशानभूमीत होणार दफनविधी

Follow Us
Close
Follow Us:

बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या अंत्यसंस्कारासाठी बदलापूरपाठोपाठ अंबरनाथ शहरात आंदोलन करण्यात आले. अक्षयचे आई-वडील अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमीत दफन विधीची जगा पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर अंत्यसंस्काराच्या परवानगीसाठी अंबरनाथ पालिकेत गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. अंबरनाथमध्ये मनसेच्या वतीने शहरात दफनविधीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर अक्षय शिंदेचे वकील अमित कातरनवरे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारपर्यंत अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती न्यायालयाने दिली आहे. मात्र आता अक्षय शिंदेवर आता अंत्यसंस्कार बदलापूर किंवा अंबरनाथमध्ये होणार नाहीत. तर ते त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. ती जागाही ठरली आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला 7 दिवस झाले असून अंत्यविधीसाठी जागा अद्याप निश्चित झाली नव्हती. अक्षय शिंदे यांच्या पार्थिवावर सोमवारपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली होती. त्यामुळे रविवारी अंत्यसंस्कार करण्याबाबत सरकारने अंतिम पावले उचलणे गरजेचे होते. बदलापूर आणि अंबरनाथमधील आंदोलने लक्षात घेऊन पोलिसांनी तिसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अक्षय शिंदेवार यांच्यावर उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी खड्डा ही खोदण्यात आला आहे.

स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे यांच्या अंत्यसंस्काराला विरोध केला असता. अक्षयचे कुटुंब आणि अंबरनाथची अंत्ययात्राही हिंदू स्मशानभूमीत काढण्यात येणार आहे. यानंतर अंबरनाथमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास मनसे आणि शिवसेनेनेही विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात शिवसेनेने स्मशानभूमीबाहेर बॅनरही लावले असून, दुसरीकडे बदलापूर नगरपालिकेने पोलिसांना सतर्क केले आहे. मात्र त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही. अखेर पोलिसांनी त्यांच्यावर उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला दफन केले जाईल. यासाठी पोलिसांनी सर्व तयारी केली आहे.

दोन्ही चिमुरड्यांवर अत्याचार बदलापुरात झाले होते. या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी बदलापूर स्टेशनमध्ये नागरीकांचा उद्रेक झाला होता. त्या शाळेचीही तोडफोड झाली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. अखेर तळोजा कारागृहातून ठाण्याला घेवून जाताना अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. त्यात तो जागीच ठार झाला. त्यानंतर आता पर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. शेवटी अक्षयचे पालक कोर्टात धावले. कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Akshay shinde cremated at ulhasnagar crematorium today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 03:51 PM

Topics:  

  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन
1

Ulhasnagar : भाजपचं व्यापाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकते – रवींद्र चव्हाणांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.