Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये एका व्यावसायिकाचे अपहरण करून 50 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे मिळाल्यानंतर ‘थँक्यू अंकल’ म्हणणाऱ्या कथित मुख्य सूत्रधारासह पाच जणांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 04:53 PM
50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Follow Us
Follow Us:

50 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण
मुख्य सूत्रधारासह 5 जणांना अटक
उल्हासनगर पोलिसांची मोठी कारवाई

Ulhasnagar Crime: कल्याणमधील व्यावसायिक जयराम नेहलानी यांचे 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या प्रकरणाचा उल्हासनगर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार आणि इस्टेट एजंट सचिन शिरसाट याच्यासह पाच आरोपींना अटक केली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

काही दिवसांपूर्वी जयराम नेहलानी हे उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले. पोलिसांच्या तपासानुसार, अपहरणकर्त्यांनी नेहलानी यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्या सुटकेच्या बदल्यात 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. व्यावसायिकाच्या सुरक्षिततेची चिंता असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींच्या सूचनेनुसार कल्याण येथे जाऊन एका व्यक्तीकडे मागितलेली रक्कम दिली.

Gold Smuggling News: दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून ९.४० किलो सोने जप्त; सोन्याच्या तस्करीत ‘न्यू ट्रिक्स’चा पर्दाफाश

यावेळी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. पैसे स्वीकारल्यानंतर संबंधित व्यक्तीने काही वेळात जयराम नेहलानी घरी पोहोचतील, असे त्यांच्या नातेवाईकाला सांगितले. त्यानंतर ‘थँक्यू अंकल’ असे म्हणत तो तेथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नेहलानी यांच्या अपहरणाची माहिती उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपींचा शोध घेण्यासाठी 10 स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या हालचाली आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासाची साखळी जोडत पोलीस खडवली परिसरात पोहोचले. तेथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर पोलिसांना जयराम नेहलानी यांचा ठावठिकाणा मिळाला आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून पोलिसांना या प्रकरणातील इतर आरोपींबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले.
पुढील तपासात नेहलानी यांच्या परिचयातील इस्टेट एजंट सचिन शिरसाट हा या अपहरणाचा कथित मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. पोलिसांच्या आरोपानुसार, शिरसाटने काही तरुणांना सोबत घेऊन टोळी तयार केली आणि नेहलानी यांच्या अपहरणाचा कट आखला. घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अखेर त्यालाही अटक केली.

या प्रकरणात अनिल जगताप, विशाल चंद्रमोरे, रमेश जाधव, सचिन शिरसाट आणि राहुल सोनी या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर सतीश दोंदे आणि मयूर दराने हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास सुरू आहे.

या अपहरणामागील नेमका आर्थिक वाद किंवा इतर कारण काय होते, आरोपींनी अपहरणाचे नियोजन कसे केले, 50 लाख रुपयांच्या खंडणीच्या रकमेचे पुढे काय झाले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास उल्हासनगर पोलीस करत आहेत. तसेच आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA/मोका) कारवाई करण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Web Title: Ulhasnagar businessman kidnapped for 50 lakh ransom five accused arrested two absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
4

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.